शनिवार व रविवारी बाजारपेठ बंद – अत्यावश्यक सेवा मात्र सुरु राहणार
उस्मानाबाद जिल्ह्यात काय सुरू राहणार ? व काय बंद राहणार ?
उस्मानाबाद – समय सारथी
अत्यावश्यक सेवा व वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना व दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद राहणार आहेत. हॉटेल रेस्टोरेंट, खानावळ व उपहारगृह यांना मात्र शनिवारी व रविवारी घरपोच सेवा देता येणार आहे. सांयकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी तर त्यानंतर संचारबंदी लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेली किराणा दुकाने व भाजीपाला फळ,बेकरी व कृषी विषयक दुकाने शनिवारी व रविवारी सुरु राहतील तर इतर दुकाने ही 2 दिवस बंद राहतील. रविवारी जनता कर्फ्यु नसणार आहे मात्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहतील आणि जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू राहतील. वैद्यकीय सेवा, दवाखाने, लसीकरण सेवा 24 तास सुरु राहतील. खासगी आस्थापनाची कार्यालये सोमवार ते शुक्रवार सुरु राहतील.
अत्यावश्यक सेवा व वस्तूंची दुकाने आणि व्यवसाय दररोज सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील तर या सेवा वगळता इतर दुकाने व आस्थापना हे शनिवारी व रविवारी बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील रुग्णालये वैद्यकीय सेवा २४ तास सुरु राहतील.
अत्यावश्यक सेवेत पशुवैद्यकीय सेवा व खाद्याची दुकाने, वन विभागाने जाहीर केलेली कामे, सर्व किराणा दुकाने, भाजीपाला व फळ विक्रेते, दूध संकलन व वितरण केंद्र आणि बेकरी,मिठाई, चिकन, मटण, पोल्ट्री, मासे व अंडी विक्री हि खाद्यपदार्थाची दुकाने, शीतगृहे व वखार, सार्वजनिक वाहतूक, स्थानिक प्राधिकरण व विभागाची सर्व मान्सूनपूर्व करण्यात येणारी कामे, रिझर्व्ह बँकेने अत्यावश्यक म्हणून निर्देशित केलेल्या सेवा,पाणीपुरवठा व कृषी विषयक उपक्रम व अवजारे, बियाणे, खते, उपकरणे व दुरुस्तीची दुकाने, आयात- निर्यात विषयक सर्व सुविधा, ई वाणिज्य सेवा, मान्यता प्राप्त प्रसार माध्यमे,पेट्रोल पंप, शासकीय व खासगी सुरक्षा सेवा, विद्युत व गॅस सिलेंडर पुरवठा, एटीएम, पोस्ट विभागाच्या सेवा, आगामी पावसाळा ऋतूच्या अनुषंगाने आवश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग यांचा समावेश आहे. या आस्थापना दररोज सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत सुरु राहतील असे आदेशित आहे.
सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, बाग व उद्यान, क्रीडा दररोज सकाळी ५ ते ९ या वेळेत सुरु राहतील तर जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा व वेलनेस क्लब हे दररोज सांयकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील असे आदेशित केले आहे त्यामुळे यासेवा शनिवारी व रविवारीही सुरू राहतील. सार्वजनिक बस व मालवाहतूक सेवा सुरु नियमित नियमाप्रमाणे सुरू राहील.