शंभरी पार – सोमवारी कोरोनाचे जिल्ह्यात 104 रुग्ण
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने सोमवारी 104 रुग्णाचा आकडा पार केला असून दिवसेंदिवस स्तिथी गंभीर बनत चालली आहे.नमुने तपासणीत रुग्ण पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण सोमवारी 4.67 टक्के राहिले. सोमवारी 2 हजार 223 रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 104 म्हणजे 4.67 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले त्यात रॅपिड चाचणीत 42 तर आरटीपीसीआर चाचणीत 62 जण पॉझिटिव्ह आले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक 39 रुग्न सापडले आहेत तर परांडा व भूम तालुक्यात एकही रुग्ण सापडला नाही. सोमवारी 104 रुग्ण सापडले असून 9 जण उपचार नंतर बरे झाले आहेत तर जिल्ह्यात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 401 झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी 104 रुग्ण सापडले त्यात तुळजापूर 22, उमरगा 20, लोहारा 9, कळंब 11 व भूम तालुक्यात 3 रुग्ण सापडले. उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर कोरोनाचे 68 हजार 202 रुग्ण सापडले त्यापैकी 65 हजार 720 रुग्ण उपचार नंतर बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 96.36 टक्के आहे. जिल्ह्यात आजवर 1 हजार 509 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून मृत्यू दर हा 2.22 टक्के आहे.
31 डिसेंबर रोजी 9, नवीन वर्षी 1 जानेवारील 21, 2 जानेवारी 2, 3 जानेवारी 18, 4 जानेवारी 35, 5 जानेवारी 40, 6 जानेवारी 23,7 जानेवारीला तब्बल 80 रुग्ण सापडले तर 8 जानेवारी 66 व 9 जानेवारीला 23 रुग्ण सापडले.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या उपाययोजना करण्यात आल्या असून आरोग्य प्रशासन दक्ष व सज्ज झाले आहे. महसूल व पोलीस यंत्रणाही कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी काळजी व प्रतिबंधात्मक कारवाई करीत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयासह इतर रुग्णालयात 5 हजार 445 बेडस तयार करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात 1 हजार 65 बेड उपलब्ध आहेत. 1 हजार 400 ऑक्सिजन बेड, 183 व्हेंटिलेटर, 199 आयसीयू बेडची गरजेनुसार उपलब्धता करण्यात येणार आहे तर खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड कोरोना रुग्णासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.जिल्ह्यात 52.44 मेट्रिक टन लिक्वीड ऑक्सिजन उपलब्ध होणार असून 12.14 मेट्रिक टन ऑक्सिजन हा हवेतून जमा करून सिलेंडरमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे.