विरोधकांना पोटदुखी – मुख्यमंत्री, कृषी मंत्री यांच्यासोबत कधीही बैठक लावा
आमदार राणा यांना खुले आव्हान देणारा अजून जन्माला आला नाही , सडेतोड उत्तर देऊ
लढणाऱ्या नेत्याला बदनाम करू नका, जनता ओळखुन आहे – युवा नेते मल्हार पाटील
उस्मानाबाद – समय सारथी
पीक विम्याच्या विषयावरून शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर हल्लबोल केल्यानंतर आमदार राणा यांचे पुत्र तथा भाजप युवा नेते मल्हार पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे. पीक विम्याच्या यशाचे श्रेय शेतकरी हे आमदार राणा यांना देत असल्याने विरोधकांना पोटदुखी होत आहे. हिम्मत असले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक लावा त्या बैठकीत तुम्हाला आमदार राणा हे मुद्देसूद सडेतोड उत्तर देतील मात्र लढणाऱ्या नेत्याला बदनाम करू नका असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्याच्या दरबारात बैठक घेण्याचे आव्हान शिवसेनेच्या नेत्यांना केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे बुडल्यात जमा होते मात्र आमदार राणा यांनी कायदेशीर लढा दिल्यानंतर हे पैसे 6 आठवड्यात देण्याचे आदेश उच्च न्यायलायाने दिले आहेत. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणा विरोधात हा निकाल असून त्यासाठी आमदार राणा यांनी प्रयत्न केले. पीक विम्याचे श्रेय हे आमदार राणा यांना मिळत असल्याने विरोधकांना पोटदुखी होत आहे.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना खुले आव्हान देण्याची लायकी विरोधकात नाही, आमदार राणा यांना खुले आव्हान देणारा अजून जन्माला आला नाही. जर विरोधकात हिम्मत असेल तर त्यांनी पीक विमा या विषयावर केव्हाही मुख्यमंत्री, कृषी मंत्री यांच्याकडे बैठक लावावी त्यात आमदार पाटील हे शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांना व त्यांच्या प्रश्नांना मुद्देसूद उत्तर देतील. मंजूर पीक विम्याचे प्रकरणी शेतकरी, कार्यकर्ते यांनी मनापासून आमदार राणा यांचे आभार मानले आहेत.
शेतकरी जनता यांना माहित आहे की बुडालेला पिक विमा हा राणा पाटील यांच्यामुळे मिळणार आहे. लढणाऱ्या या नेत्याला कितीही बदनाम, टिका व टिपण्णी केली तरी जनता सर्वांना ओळखून आहे. आमदार राणा यांच्या सोबत बैठक लावण्याची विरोधकांची लायकी नाही, मुख्यमंत्री कृषिमंत्री यांच्या सोबत कधीही बैठक लावा त्याला सडेतोड उत्तर राणा देतील असे आव्हान मल्हार पाटील यांनी केले आहे. या आव्हानंतर शिवसेना नेते काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.