विनयभंग प्रकरण – मलकापूरचे एकनाथ लोमटे महाराज यांना 45 दिवसानंतर अटक
उस्मानाबाद – समय सारथी
राज्यभर प्रसिद्ध असणारे येरमाळा जवळील मलकापूरचे स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांच्यावर विनयभंगचा गुन्हा 28 जुलै 2022 रोजी दाखल करण्यात आला होता त्यांना कळंब पोलिसांनी 45 दिवसानंतर अटक केली आहे. गुन्हा नोंद झाल्यापासून लोमटे महाराज हे फरार होते.
पीडित महिला मलकापूर येथील मठात दर्शनासाठी गेली असता महाराजांनी विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेला प्रसादाच्या पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला असून त्याची क्लिप माझ्याकडे असल्याचे धमकावत विनयभंग केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. महिलेच्या तक्रारीवरून येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराजवर या अगोदर ही अनेक फसवणूकीच्या व भोंदूगिरीच्या तक्रारी आहेत. राजकिय वरदहस्त असल्याने महाराज अनेकदा चर्चेत आले आहेत.
कळंब तालुक्यातील मलकापूर येथे लोमटे महाराज यांचा मठ आहे. आपल्या दैवी शक्तीने महाराज आजारी व्यक्ती आणि भक्ताला बरे करतात अशी महाराज यांची ख्याती आहे.