वाशी व लोहारा नगरपंचायत निवडणुक – पुर्वीची आरक्षण सोडत कायम
उस्मानाबाद – समय सारथी
जिल्ह्यातील लोहारा वाशी नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आरक्षण सोडतीमध्ये आरक्षण 50 टक्क्यापेक्षा जास्त नाही असा अहवाल देण्यात आल्याने नगर पंचायतमधील यापुर्वीची आरक्षण सोडत कायम करण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा नगरपंचायतमध्ये एकूण 17 सदस्य असून अनुसूचित जातीमधील एक महिला, सर्वसाधारण गटातील एक महिला, नागरिकांच्या मागास प्रवर्गात 2 जागा या सर्वसाधारण गटासाठी तर 3 जागा महिलांसाठी राखीव असतील. सर्वसाधारण गटात 5 जागा महिलांसाठी राखीव तर 5 जागा सर्वसाधारण गटात असतील.
वाशी नगरपंचायतीमध्ये एकूण 17 सदस्य असून अनुसूचित जाती प्रवर्गात 1 जागा सर्वसाधारण तर 2 जागा महिलासाठी राखीव असतील. नागरिकांच्या मागास प्रवर्गात गटात 2 जागा सर्वसाधारण तर 3 जागा महिलांसाठी राखीव असतील तसेच सर्वसाधारण गटात 5 जागा सर्वसाधारण तर 4 जागा महिलांसाठी राखीव असतील.
नगरपंचायत लोहारा व वाशी यांचे आरक्षण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नाही असा अहवाल उस्मानाबाद नगर विकास शाखेचे जिल्हा प्रशासन अधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी 11 नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाला दिला असल्याने वरील प्रमाणे आरक्षण सोडत कायम करण्यात आली आहे