वक्फ जमिनीचे संकलन सुरु – राजपत्रानुसार जिल्ह्यात 8 हजार 743 एकर जमीन
तेर,नळदुर्ग,ढोकी,उस्मानाबाद, परंडा, मुरूम, भुम येथे सर्वाधिक जमीन
विविध दर्गाह,मशीद, कब्रस्तान यासह अन्य संस्थांना सेवेसाठी जमीन बहाल
उस्मानाबाद – समय सारथी
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार उस्मानाबाद वक्फ मंडळाच्या जमिनीच्या माहितीचे संकलन करणे सुरु आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात प्राथमिक माहितीनुसार जवळपास 120 गावात 8 हजार 743 एकर जमीन असून ही जमीन विविध दर्गा, मशीद, कब्रस्थान यासह अन्य संस्थांना विविध सेवा करण्यासाठी मुतवल्ली, मशायक, इनामदार,मुजावर,हिस्सेदार यांना सेवेसाठी देण्यात आल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर,नळदुर्ग,ढोकी,उस्मानाबाद, परंडा, मुरूम,भूम येथे सर्वाधिक जमीन आहेत. तेर येथे 868 एकर,नळदुर्ग 830,मुरूम 513,परंडा शहर 643,उस्मानाबाद शहर 477,भूम शहरात 193, माणकेश्वर 290 अशी जमीन आहे. सर्वाधिक जमीन जामा मशीद यांची आहे. राजपत्रात नमूद असलेल्या जमिनीची माहिती जिल्हा वकफ अधिकारी अहमद खान यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला गाव, गट नंबर, क्षेत्रनिहाय दिली आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना याबाबत 14 मुद्यांची माहिती मागवली असून अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले- डंबे या समन्वय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यात 8 हजार 743 एकर जमीन वक्फ बोर्डाची आहे यात सर्वाधिक उस्मानाबाद तालुक्यात 2 हजार 676 एकर यात, त्यापाठोपाठ तुळजापूर तालुक्यात 2 हजार 596 एकर, परंडा 1 हजार 398,उमरगा 735, कळंब 581,भुम 493, लोहारा 139 व वाशी तालुक्यात 124 एकर जागा आहे. याव्यतिरिक्त इतर ठिकाणी वक्फ बोर्डाची जमीन आहे का ? या जमिनीची सद्य स्तिथी काय ? याचा शोध घेऊन अहवाल तयार करणे सुरु आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकी व उस्मानाबाद शहरात वक्फ मंडळाची मोठया प्रमाणात जमीन असून उस्मानाबाद शहरातील मोक्याच्या जमिनी या विनापरवाना भाडेपट्ट्याने देण्यात आल्या असून अतिक्रमन केलेले आहे. ढोकी गावात जामा मशीद व कब्रस्थानची विविध 30 सर्व्ह नंबर मध्ये 673 एकर जमीन आहे व देवळाली येथे 94 एकर जमीन आहे तर एकट्या तेरमध्ये जामा मशीदची 460 व कबीरदास मठची 408 अशी या 2 संस्थानची सर्वाधिक 868 एकर जमीन आहे, जिल्ह्यात सर्वाधिक जमीन ही तेर गावात आहे. उस्मानाबाद शहरात हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी मशीद व कब्रस्थानची 265 एकर व जामा मशीद यांची 212 अशी उस्मानाबाद शहरात जवळपास 412 एकर जमीन आहे तर शहराशेजारी असलेल्या गडदेवधरी येथे मशीद व दर्गा शेख फरीद यांची 187 एकर जमीन,वाणेवाडी 67 एकर, कोळेवाडी 61, सारोळा येथे 50,काजळा 12, बेंबळी 24,दारफळ 14,कोंड येथे दर्गा मस्तान शहावली यांची 44 एकर जमीन आहे.
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे 830 एकर जमीन आहे. काटी येथील जामा मशीद यांची 254 एकर,ईदगह यांची नळदुर्ग शहरात 155 एकर, आंदोरा 94, मुरूम येथे 214 अशी 462 एकर जमीन आहे.मशीद हस्तदीरा यांची नळदुर्ग शहरात 115 व मुरूम येथे 133 अशी 248 एकर जमीन आहे.सावरगाव येथे जामा मशीद यांची 199 एकर व दर्गा सिद्दी अंबर यांची 64 एकर, अपसिंगा 54, जळकोट 92,कुंभारी 23,मसाला 44,मंगरूळ 54, नळदुर्ग येथे जामा मशीद शाही यांची 278 तर जामा मशीद इनामदार गल्ली यांची 138, मशीद आसार शरीफ यांची 49, मशीद बाजार व कब्रस्थानची 83, उमरगा चिवरी येथे छोटी मशीद यांची 63 व जामा मशीदची 90 एकर जमीन आहे.
उमरगा तालुक्यातील मुरूम येथे 513 एकर जमीन आहे. गुंजोटी येथे दर्गा हाजी मुन्नवर यांची 58 एकर, दर्गा हजरत राजा पाशा यांची 35,ईदगाहची 70 व दर्गा शरणशाहवली यांची 17 अशी गुंजोटी येथे 180 एकर जमीन आहे. कदेर येथे मकदुम अल्लाउद्दिन चिश्ती यांची 41 व दर्गा करीम साब यांची 38 अशी 79 एकर जमीन आहे. मुरूम येथे चिल्ला ह बंदे, जामा मशीद यांची 143 एकर जमीन आहे.तुरोरी येथे 28,तिक्रोळी येथे 32 हिप्परगा मशीद 34 एकर अशी जमीन आहे.
परंडा शहरात तब्बल 643 एकर जमीन वक्फ मंडळाची असून यात हजरत ख्वाजा बद्रोद्दीन यांची 171 एकर, छिल्ला ह गुलाम यांची 72,जामा मशीद कीला शमशीर मशीद यांची 173 एकर,मशीद कसबा मोहल्ला यांची सर्वाधिक 226 अशी एकूण शहारात जमीन आहे. आरणगाव येथे 55, देवळाली 89,घारगाव 44,जवळा 40, काद्राबाद 46, तांदुळवाडी व रोहकल 45,राजुरी 46 सह शिराळा येथे दर्गा पीर गैबी साहब यंची 105 एकर जमीन आहे.
कळंब तालुक्यातील शिराढोण येथे दर्गा ख्वाजा नसिरोद्दीन यांची 169 एकर, आढाळा 88,खामसवाडी 35,मोहा येथे दर्गा सय्यद अलवी आशुरखान यांची 117 एकर,येरमाळा 20, रांजणी 20, हावरगाव 16, पिंपळगाव 20 एकर जमीन आहे. वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे दर्गा हजरत याकूब साहब यांची 75 एकर व इतर 10 अशी 86 एकर, पारगाव 16, सरमकुंडी 22 एकर जमीन आहे. लोहारा तालुक्यात खेड येथे 24,आष्टा 13,मार्डी 46,सास्तूर येथे 52 एकर जमीन आहे.
भूम तालुक्यात माणकेश्वर येथे सर्वाधिक 290 एकर जमीन असून यात दर्गा तय्यब उल कादरी यांची 119, मशीद उमर 12 व जामा मशीद यांची 159 एकर जमिनीचा समावेश आहे तर शेकापूर येथे 59 एकर, देवांग्रा 44,निपाणी 88 एकर,चिंचपूर 41 एकर तर भूम शहरात जामा मशीद यांची 193 एकर जमीन आहे.