लॉक डाउन – नांदेड जिल्ह्यात अखेर 11 दिवसांचा लॉकडाउन
नांदेड – समय सारथी
कोरोना रुग्णाची दिवसेंदिवस वाढती संख्या पाहता नांदेड जिल्ह्यात 11 दिवसांचा लॉकडाऊन जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला आहे. मराठवाड्यातील नांदेडमध्ये अखेर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून 25 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत लॉक डाऊनचे आदेश जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी काढले आहेत .
बार ,लॉज , हॉटेल ,चिकन मटण , यांना घरपोच पुरवठा करण्याची मुभा असणार असून वैद्यकीय कारणासाठी वाहतुकीला परवानगी आहे तर बँका सुरू मात्र ग्राहकांना प्रवेश नाही. किराणा दुकाने सकाळी 12 वाजेपर्यंत तर भाजीपाला ,फळ विक्रीसाठी सकाळी 7 ते 10 पर्यंत वेळ असणार आहे. घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा सुरू राहतील तर शेती विषयक व्यवहार राहणार सुरु आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात ही कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 723 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 1 लाख 42 हजार 215 नमुने तपासले त्यापैकी 18 हजार 342 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याच दर 14.22 टक्के आहे. जिल्ह्यात 17 हजार 030 रुग्ण बरे झाले असून 92.85 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 589 रुग्णांचा मृत्यू झाला असून 3.21 टक्के मृत्यू दर आहे.
कोरोनाचा वाढता आलेख पहा
1 मार्च – 9
2 मार्च – 40
3 मार्च – 16
4 मार्च – 45
5 मार्च – 26
6 मार्च – 30
7 मार्च – 49
8 मार्च – 16
9 मार्च – 38
10 मार्च – 24
11 मार्च – 58
12 मार्च – 27
13 मार्च – 54
14 मार्च – 69
15 मार्च – 52
16 मार्च – 123
17 मार्च – 94
18 मार्च – 164
19 मार्च – 119