लॉकडाउनमध्ये सूट – नागरिकांसह व्यापारी यांना मोठा दिलासा
24 मे पासून सकाळी 7 ते 11 अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात 24 मे सोमवार पासुन जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवेबरोवरच जीवनावश्यक बाबींना सूट देण्यात आली असून सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
अत्यावश्यक सेवेत सर्व किराणा दुकाने, भाजीपाला , फळ, दूध संकलन व वितरण, सर्व प्रकारचे खाद्य पदार्थ दुकाने यात बेकरी, मिठाई , चिकन , मटण, पोल्ट्री, मासे व अंडी दुकाने यांचा समावेश असून घरपोच सेवा अपेक्षित आहे. रेस्टरट बार व हॉटेल यांना घरपोच सेवा देत येईल.पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने , सर्व पेट्रोल पंप सुरू राहतील या दुकानांना 11 नंतर घरपोच सेवा देण्यासाठी परवानगी असणार नाही. राष्टीयकृत खासगी सहकारी बँका पोस्ट ऑफिस व कृषी विषयक दुकाने दुपारी 2 पर्यंत सुरू राहतील. दर शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यु असेल व वरील आस्थापना वगळता अन्य दुकाने मात्र बंद असतील.