लसीकरण – 8 मेचे बुकींग स्लॉट खुले , नोंदणी करण्याचे आवाहन
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला 3 मे सोमवार पासून सुरवात झाली असून 8 मे शनिवार या एका दिवसाचे लसीकरण बुकिंग स्लॉट खुले करण्यात आले असून यासाठी कोविन या ऑनलाइन अँपवर नोंदणी करता येईल.
18 ते 45 या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण होत असून जिल्हा शासकीय रुग्णालय उस्मानाबाद, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, उमरगा , कळंब व परंडा या 5 ठिकाणी लस दिली जात आहे.
8 मे या दिवशी सर्व 5 ही लसीकरण केंद्रावर कोरोनाची सिरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड ही लस दिली जाणार आहे अशी माहिती लसीकरण अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी यांनी दैनिक समय सारथीची दिली. त्यामुळे ज्यांना कोविशिल्ड ही लस घ्यायची आहे त्यांनीच हे बुकिंग करावे जेणेकरून इतर गरजूंना लस देणे शक्य होईल.
*6 मे 2021 रोजी चे कोविड लसीकरण केंद्र*
*केवळ कोविशिल्ड लसीचा फक्त दुसरा डोस देय असलेल्या लाभार्थ्यांसाठी लसीकरण केंद्र ठिकाणे -* शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद, ग्रामीण रुग्णालय तेर, लोहारा, सास्तूर, मुरूम, वाशी आणि भुम.
*कोविन पोर्टलवर ऑनलाईन स्लॉट बुकींग केलेल्या 18+ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांसाठी चे लसीकरण केंद्रे* – जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद, उपजिल्हा रुग्णालय उमरगा, तुळजापूर, कळंब आणि परांडा