उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला 3 मे सोमवार पासून सुरवात होणार असून यासाठी कोविन या ऑनलाइन अँपवर नोंदणीला सुरूवात झाली आहे.
3 मे ते 7 मे दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्याचे स्लॉट बुकिंगसाठी खुले करण्यात आले असून स्थळ व वेळेची नोंदणी ही ऑनलाइन नोंद केल्यावर करता येणार आहे त्यानुसार वेळेचे स्लॉट मिळणार आहेत.
18 ते 45 या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण होत असून जिल्हा शासकीय रुग्णालय उस्मानाबाद, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, उमरगा , कळंब व परंडा या 5 ठिकाणी लस मिळणार असून दररोज 200 डोस याप्रमाणे ऑनलाइन स्लॉट बुकिंग सुरू आहे.
3 मे ते 7 मे या काळातील उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालय येथील सर्व दिवशीचे स्लॉट बुक झाले असून तुळजापूर येथील 3 व 4 मे चे स्लॉट बुक झाले आहेत व त्यात ऑनलाइन नोंदणी होत असल्याने भर पडत आहे. 3 मे चे पहिल्या दिवशीचे 5 केंद्रावरचे सर्व स्लॉट बुकिंग फुल्ल झाली आहे.
3 ते 7 मे या काळात या सर्व 5 ही लसीकरण केंद्रावर कोरोनाची सिरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड ही लस दिली जाणार आहे अशी माहिती लसीकरण अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी यांनी दैनिक समय सारथीची दिली. जशी लस उपलब्ध होईल तसे 7 मे नंतरचे स्लॉट बुकिंगसाठी खुले केले जातील त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रवर गर्दी करू नये असे आवाहन केले.