रोहकल सरपंचाचे पती हनुमंत कोलते यांना 1 लाखांची लाच घेताना अटक – धाराशिव लाचलुचपत विभागाची कारवाई
कोलते राष्ट्रवादीचे स्थानिक नेते – लोकप्रतिनिधीच लाचखोर, जनतेचे हाल
धाराशिव – समय सारथी
एका ठेकेदार कंपनीला ग्रामपंचायतमधील काम सुरु करू देण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागून 1 लाख रुपये लाच घेताना घेताना एका सरपंच पतीस धाराशिव लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात अटक केली आहे.परंडा तालुक्यातील रोहकल या ग्रामपंचायतमधील कामे सुरु करू देण्यासाठी ही लाच घेतली आहे. रोहकल येथील सरपंच पती हनुमंत पांडुरंग कोलते यांना 1 लाखांची लाच घेताना अटक केली आहे.
मी लाखो रुपये खर्च करुन निवडणुकीत निवडून आलो आहे त्यामुळे आता वसुली करणार, तुम्ही गुपचूप पैसे द्या अन्यथा परिणाम वाईट होतील, काम करू देणार नाही यासह अनेक धक्कादायक बाबी संभाषणात आल्याची लाचलुचपत विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
परंडा तालुक्यात लाचखोरीने कळस गाठला असुन त्यात लोकप्रतिनिधीने कळस गाठला आहे. कोलते हे राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित असल्याची माहिती असुन त्यांची पत्नी सरपंच असून त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गेली अनेक वर्ष संचालक आहेत. कोलते दाम्पत्याच्या संपत्तीची लाचलुचपत विभागाने चौकशी करावी अशी मागणी होत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत कामात अनेक ठिकाणी ठेकेदार यांची स्थानिक लोकप्रतिनिधी मार्फत पैशासाठी अडवणूक होत आहे.
रोहकल गावातील तीन जलजीवन योजनेच्या साईडचे प्रत्येकी 50 हजार रुपये प्रमाणे 1 लाख 50 हजार रुपये किंवा सोलरच्या तीन प्लेट व त्याचे साहित्य द्या अशी लाच मागितली व 1 लाख रुपये घेताना अटक केली आहे.
तक्रारदार हे मेनकर एनर्जी प्रा. लिमिटेड कंपनी मध्ये साईड सुपर वायझर म्हणून नेमणूकीस आहेत आणि कंपनीचे जल जीवन मिशन अंतर्गत सौर उर्जेंवर आधारित दुहेरी पंप लघुनळ योजनेचे काम रोहकल गावातील 3 वस्तीवर चालू असून यातील आरोपी हनुमंत पांडुरंग कोलते यांनी सदर योजनेचे काम थांबवून ते पूर्ववत चालू करू देण्यासाठी यातील तक्रारदार यांना 22 मार्च रोजी चालू असलेल्या तीन साईडचे प्रत्येकी 50 हजार रुपये प्रमाणे 1 लाख 50 रुपये किंवा सोलरच्या तीन प्लेट व त्याचे साहित्य अश्या लाचेची मागणी पंचांसमक्ष करून तडजोडी अंती 1 लाख लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून आज 1 लाख लाच रक्कम धाराशिव ज़िल्हा परिषदेच्या उपहार गृह येथे पंचांसमक्ष स्विकारल्याने आरोपी यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन आनंदनगर, उस्मानाबाद येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
पोलिस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस अधीक्षक संदीप आटोळे व अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांनी मार्गदर्शन केले. सापळा पथकात पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, इफ्तेकार शेख, सचिन शेवाळे, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर यांनी काम पहिले.