राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा पर्व 2 – तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करणार दौरा
24 जुन ते 4 जुलै दरम्यान यात्रा – पक्ष आढावा बैठकासह जलसंपदा विभागाचा दौरा
उस्मानाबाद – समय सारथी
तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन 24 जून पासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परिवार संवाद यात्रेची सुरुवात करणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या परिवार संवाद यात्रेच्या दुसऱ्या पर्वाला उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथुन सुरुवात होणार आहे तर 4 जुलै रोजी बीड येथे समारोप होणार आहे.
24 जून ते 4 जुलै या दरम्यान होणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाची परिवार संवाद यात्रामध्ये विधानसभा मतदार संघ निहाय आढावा व जलसंपदा विभागाच्या अधिकारी यांची बैठक घेणार असून यात ते जलसंपदा विषयावर माहिती घेणार आहेत त्यामुळे पक्ष बांधणी बरोबरच जलसंपदा विभागाचे प्रलंबीत प्रश्न सुद्धा मार्गी लागणार आहेत.
24 जुन रोजी सकाळी 10 वाजता जयंत पाटील हे तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतील त्यानंतर ते तुळजापूर येथे तुळजापूर व उमरगा विधानसभा मतदार संघ आढावा घेतील त्यानंतर दुपारी 2.30 ते 3.30 दरम्यान जिल्हा जलसंपदा अधिकारी यांची बैठक उस्मानाबाद येथे घेतील. 3.30 वाजता उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी बैठक, 4.15 वाजता उस्मानाबाद विधानसभा मतदार संघ आढावा, सायंकाळी 6 वाजता वाशी येथे भूम परंडा विधानसभा मतदार संघ आढावा घेऊन ते उस्मानाबाद येथे मुक्काम करतील. 25 जून रोजी सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेतील.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्ष बांधणीच्या अनुषंगाने विधानसभा मतदार संघ, शहर निहाय बैठका घेऊन जिल्हा कार्यकारिणी व अन्य महत्वाच्या पदाधिकारी बैठक घेणार आहेत यामुळे पक्षला बळ मिळणार आहे.
24 जून रोजी उस्मानाबाद , 25 जून लातूर येथे घेणार बैठक घेणार आहेत.या परिवार संवाद यात्रेत जयंत पाटील लातूर ,नांदेड , यवतमाळ, हिंगोली , परभणी, जालना, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यात बैठक घेणार आहेत.