राजशिष्टाचाराचे पालन – आमदार राणा पाटील यांनी घेतले खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव मात्र ओमराजे यांनी राणांना टाळले
धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील दिव्यांग कार्यक्रमात भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मोठ्या मनाने राजशिष्टाचार पाळत अनपेक्षितपणे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांचे नाव घेतले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकमेकांचे परंपरागत राजकीय विरोधक असलेल्या आमदार राणा व खासदार ओमराजे यांच्यात खडाजंगी होत मोठे वाकयुद्ध झाले होते.
त्याच्या दुसऱ्या दिवशी हे दोन्ही नेते एकाच व्यासपिठावर येणार असल्याने कार्यकर्ते व उपस्थित नागरिक अधिकारी यांच्यात तणाव होता मात्र कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आमदार राणा यांनी संयम दाखवत खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील या दोघांची नावे घेतली त्यामुळे तणाव निवळला. आमदार राणा हे शांत, संयमी नेतृत्व म्हणून ओळखले जातात त्याचे दर्शन त्यांनी पुन्हा करुन दिले.
आमदार राणा यांनी दिव्यांग कार्यक्रमाचे स्वरूप, परदेशी याची उपस्तिथी अन्य मान्यवर पाहून समय सूचकता दाखविली. खासदार व आमदार या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे भाषण शांतचित्ताने ऐकले. आमदार राणा यांनी ओमराजे यांचे नाव घेताच ओमराजे यांनी स्मित हास्य केले.
मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्या समोर वाद टाळणे या दोघांनी पसंद केल्याचे दिसले त्यामुळे परदेशी यांची उपस्थिती एक प्रकारे कामी आली असेच म्हणावे लागेल. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. ओमराजे यांनी आमदार राणा पाटील वगळता सर्वांची नावे घेतली.
आमदार राणा यांनी कैलास पाटील यांची दिव्यांग बाबतची मागणी योग्य असल्याचे सांगत समर्थन दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता उपस्थितीत होते. वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हजर होते.
खासदार ओमराजे यांनी आमदार कैलास पाटील यांचे कौतुक केले. कैलास पाटील यांनी प्रथम कळंब येथे कार्यक्रम आयोजीत केला व 30 दिव्यांगना लाभ दिला त्यानंतर 1 हजार 525 चा कॅम्प झाला. स्पर्धा अशी असावी त्यानंतर 3 हजार 584 चा कॅम्प झाला. दिव्यांग यांना मदत करता आली याचे समाधान वाटले. दिव्यांग यांना 5 हजार मासिक वेतन द्यावे अशी मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली.
स्व विलासराव देशमुख यांनी कृष्णा मराठवाडा स्थिरीकरण योजनेला सुरुवात झाली. आत्महत्या मागासलेल्या यादीत धाराशिव जिल्हा आहे. कैलास पाटील यांनी महाविकास आघाडीच्या काळात कामाचा प्राधान्यक्रम ठरविला त्यामुळे पाणी येईल अशी आशा झाली. महाविकास आघाडी काळात हे झाले.
कर्मावर माझा विश्वास आहे, इथेच परतफेड आहे. पुण्याईची शिदोरी भक्कम असावी त्यातून पुढच्या अनेक पिढ्यानं आशिर्वाद मिळावा असे स्व पवनराजे निंबाळकर यांनी शिकविले आणि त्याचप्रमाणे मी काम करीत आहे प्रत्येक माणसाच्या मदतीला जात आहे. प्रामाणिकपणे लोकांना मदत करत आहे. वाईट काम करताना विचार करा.
जनतेचा टॅक्सचा हा पैसा आहे त्यातून साहित्य घेऊन तुम्हाला देतो. कोणी शेतातील सोयाबीन विकून देत नाही त्यामुळे मोठेपना दिखावू नका, कर्तव्यपुर्ण करणे ही प्राथमिकता आहे असे ओमराजे म्हणाले.