उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे १२ रुग्ण सापडले असून सर्वाधिक ८ रुग्ण हे उमरगा तालुक्यातील आहेत. शनिवारच्या पेंडिंग रिपोर्टमधील १२ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे त्यात उमरगा तालुक्यातील ८, उस्मानाबाद तालुक्यातील २, तुळजापूर आणि कळंब तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे व डॉ सतीश आदटराव यांनी दिली.
उमरगा शहरात २ रुग्ण असून त्यापैकी एक रुग्ण डॉ शेंडगे हॉस्पिटलमधील आहे. नागराळ व गुंजोटी येथे प्रत्येकी ३ रुग्ण सापडले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे २ रुग्ण असून हे तेर हॉस्पिटलमधील कर्मचारी आहेत. कळंब तालुक्यातील उपळाई येथे २ रुग्ण असून त्यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरु आहेत. तुळजापूर तालुक्यातील धोत्री येथे एक रुग्ण सापडला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे २८० रुग्ण असून त्यापैकी १९१ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत तर ७५ जणांवर उपचार सुरू आहेत आजवर १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर ५ टक्के इतका आहे तर उपचारानंतर रुग्ण बरे होण्याचा दर ६८.२१ टक्के आहे. उस्मानाबाद जिल्हयातील ३ हजार ८७० रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असून त्यापैकी ३ हजार २३७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर २८० पॉझिटिव्ह आहेत.
उस्मानाबाद तालुक्यातील ६४,तुळजापूर ४५,उमरगा १६,लोहारा २,कळंब ४९, भूम २ व परंडा तालुक्यात १३ असे १९१ रुग्ण बरे झाले आहेत तर उस्मानाबाद येथे ९ तर उमरगा ४ व भूम येथे १ रुग्ण मयत झाला आहे.