येणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत धाराशिव संभाजीनगर नामकरण होणार – मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबादचे धाराशिव व औरंगाबादचे संभाजीनगर हे नामकरण येणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. शेवटच्या कॅबिनेटमध्ये सरकार अल्पमतात असल्याने हे नामकरण स्थगित केले होते. आम्ही राज्यपाल यांना पत्र लिहल्यावर व कोर्टात केल्यावर कॅबिनेट बैठक घेता येत नाही त्यामुळे येणाऱ्या बैठकीत सर्व बाबींची पूर्तता करुन नामांतरण निर्णय घेण्यात येणार आहे, याबाबत विभागीय आयुक्ताना कळविण्यात आले आहे.
नामांतरण स्थगित केल्याच्या निर्णयावर विरोधी पक्ष नेते अजित पवार, संजय राऊत यांच्यासह अन्य नेत्यांनी टीका केली तर सोशल मीडियावर शिंदे भाजप सरकारच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर टीका झाल्यानंतर शिंदे फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. हिंदुत्ववादी भूमिका का बदलली असे पवार म्हणले. औरंगजेब तुमचा नातेवाईक कधी झाला असे राऊत म्हणाले तर दानवे यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राज्यपाल यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र दिलेले असताना मंत्रिमंडळ बैठकीत लोकप्रिय व धोरणत्मक निर्णय घेता येत नसल्याचे कारण पुढे करीत हे नामकरण रद्द केले आहे.आगामी काळात कायदेशीर पेचप्रसंग व अडथळे नको म्हणून हा निर्णय स्थगित केला असल्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.
आम्ही जेव्हा हिंदुत्वचा निर्णय घेतला व भाजप सोबत गेलो, तेव्हा शेवटच्या कॅबिनेट बैठकीत नामांतरण निर्णय घेतला, ते असले तरी आम्ही त्याचे स्वागत केले मी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना या महाविकास आघाडी सरकारने 29 जुन रोजी मंत्रिमंडळ बैठकीत नामकरण निर्णय घेतला, या निर्णयाला काँग्रेस राष्ट्रवादीने सहमती दिली होती.