मुंडे यांनी महंताची माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई करू
तुळजापूर येथील बैठकीत महंत, पुजारी, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी
तुळजापुर – समय सारथी
उस्मानाबाद येथील नगरसेवक प्रदीप मुंडे यांनी तुळजापूर येथील महंत मावजीनाथ महाराज यांची माफी मागावी अन्यथा कायदेशीर पद्धतीने सदरील झालेल्या घटनेबाबत आम्ही आवाज उठविणार आहोत असा इशारा देण्यात आला.
तुळजापूर शहरवासीय कोणत्याही महाराजांचा अपमान कदापी सहन करणार नाही, महंताचा अपमान म्हणजे समस्त तुळजापुरकरांचा अपमान अशा प्रतिक्रिया समस्त तुळजापुरकर वाशियांच्या वतीने दशअवतार मठामध्ये मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उमटल्या. पत्रकार परिषदेत महंत माऊजीनाथ महाराज, महंत तुकोजीबुवा, महंत अरण्यबुवा महाराज, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव सांळुके,भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर- कदम, उपाध्ये मंडळाचे अनंत कोंडो, नगरसेवक सुनील रोचकरी, औदुंबर कदम, भाजपाचे युवक तालुका अध्यक्ष आनंद कदंले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अमर चोपदार, भाजपाचे गुलचंद व्यवहारे, सुहास सांळुके, शिवाजी बोधले, भाजपा युवा मोर्चाचे राजेश्वर कदम, शिवसेनेचे बापुसाहेब नाईकवाडी,सागर इंगळे, काँग्रेसचे लखन पेंदे, सुदर्शन वाघमारे, मराठा क्रांती मोर्चाचे अर्जुन सांळुके, अँड बर्वे, जनहित संघटनेचे अजय सांळुके, राकाँचे शहर संघटक बबन गावडे,भारत रोचकरी, नानासाहेब डोंगरे, हृषीकेश सांळुके आदीसह शहरातील सर्वपक्षीय, विविध संघटनेचे पदाधिकारी व समस्त तुळजापुरकरवासीय उपस्थित होते.
महंत माऊजीनाथ महाराज उस्मानाबाद येथे जिल्हा सत्र न्यायालयात तारखेसाठी गेले असता उस्मानाबाद येथील नगरसेवक प्रदीप मुंडे व त्यांच्या वाहन चालकांने महंतास आर्वच्च भाषेत उद्दट भाषा वापरली होती, झालेला प्रकार हा निंदनीय आहे त्यामुळे नगरसेवक प्रदीप मुंडे यांनी महंताची माफी मागावी अन्यथा कायदेशीर पद्धतीने सदरील झालेल्या घटनेबाबत आम्ही आवाज उठविणार आहोत असा इशारा दिला.
तुळजापुर हे देवीचे शक्ती पीठ आहे, या तिर्थक्षेञातील मठाधिश हे भगवे वस्त्र धारण करणारे गुरुसमान व्यक्ती आहेत. महंत आजीवन मठाधिपती असतात मठाधिशाच्या गादीचा अपमान केला आहे, हे योग्य नाही. तुळजापूर येथे सर्व संप्रदायाचे मठ आहेत. सनातन कार्य पूढे घेऊन जाण्याचे कार्य सुरू आहे,सनांतन संस्कृती जपतात सदरील प्रकरणास राजकीय वळण दिले आहे,कोणत्या द्वेषापोटी हे कृत्य केले समजत नाही,महंताची अस्मिता जपली गेली पाहिजे. साधु संताना केलेली अशी उर्मट भाषा वापरुन अपमान करणे ही बाब निदंनीय आहे तरी दोषी व्यक्तीला योग्य ते शासन झाले पाहिजे अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.