मी शिवसेनेतच, नाराज नाही- पक्षाने दिलेली जबाबदारी सजगपणे पार पाडतोय – माजी मंत्री डॉ तानाजीराव सावंत
उस्मानाबाद – समय सारथी
मी शिवसेना पक्षात आहे आणि राहणार आहे. मी पक्षावर नाराज नाही. शिवसेना पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी मी सजग होऊन पार पाडत आहे अशी माहिती माजी मंत्री आमदार डॉ तानाजीराव सावंत यांनी दिली आहे. मी जनसेवेला व समाज सेवेला प्राधान्य देतो. माजी नितीमत्ता व वृत्ती चांगली आहे त्यामुळे उठसुठ कोणी काहीही चर्चा , आरोप केले तरी मी त्याला नेहमी उत्तर देण्याचा पायंडा पाडणार नाही असे ते म्हणाले.
कोण का आणि काय म्हणतंय चर्चा करतोय याकडे मी लक्ष देत नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माझ्या विधिमंडळ परिसरातील भेटीचा जाणीवपूर्वक विपर्यास केला गेला आहे. शैक्षणिक काम होते मात्र वेगळा अर्थ काढला गेला. जाणीवपूर्वक मला बदनाम केले जात आहे मी नाराज नाही अशी आमदार डॉ तानाजीराव सावंत यांनी माहिती दिली.
मला कोरड्या राजकारणात रस नाही – व्हायरल विडिओ
रोजगार निर्मिती करतो त्यात आपली मुलं असली असली पाहिजेत. नुसतं राजकारण नुसतच राजकारण याचा उपयोग नाही. कोरडे राजकारण होणार असेल तर त्या गोष्टीत मला इंटरेस्ट नाही. निवडणूक लढणे आणि त्यात जिंकून येणे ही बाब मी दुय्यम समजतो, समाजसेवा आपली चालू आहे. 40 वर्ष कोणी पाहिले नाही आपल्याकडे,लोकांना काही दिले पाहिजे त्यांची गरिबी दूर झाली पाहिजे या पद्धतीने तुमच्या सहकार्याची गरज आहे.येत्या 2 ते 4 महिन्यात दिवस बदलतील एका वेगळ्या रुपात मी तुमच्या समोर येणार आहे त्यावेळी काय मागायचे ते मागा असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सावंत यांचा हा व्हिडिओ 1 महिना जुना असून तो समोर आला आहे. हा व्हिडिओ 3 दिवस पूर्वी झालेल्या फडणवीस यांच्या भेटीशी जोडून विपर्यास केला जात आहे असे सावंत म्हणाले.