महिला सुरक्षा रक्षकाचा विनयभंग – प्रवेशबंदी असलेल्या पुजारी संकेत शिंदेवर गुन्हा नोंद
उस्मानाबाद – समय सारथी
तुळजाभवानी मंदिरातील महिला सुरक्षा रक्षकला शिवीगाळ करून विनयभंग केल्या प्रकरणी पुजारी संकेत अनिल शिंदे यांच्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 354, 323 सह अन्य कलमानी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गैरवर्तन केल्या प्रकरणी पुजारी संकेत शिंदे यांना 6 महिन्याची मंदिर प्रवेश बंदी असतानाही त्यांनी प्रवेश करून भाविकांना दर्शन प्रवेश रांगेत घुसवून अडवल्या नंतर महिला सुरक्षा रक्षकला शिवीगाळ करीत विनयभंग केला.
तुळजाभवानी मंदिर येथील एका 40 वर्षीय महिलेने दिल्या तक्रारीनुसार 6 फेब्रुवारी रोजी दर्शन मंडपाच्या तिसऱ्या मजल्यावर चेकिंग करित असताना पुजारी संकेत शिंदे हे काही भाविकांना आत घेऊन जात होते. संकेत शिंदे यांना जिल्हाधिकारी यांच्या 18 जानेवारी 2022 च्या आदेशाने सहा महिने मंदिर प्रवेश बंदी होती, त्यांना अडविले असता त्यांनी महिला सुरक्षा रक्षक यांना आर्वच्च भाषेत शिवीगाळ करून बलात्कार करण्याची धमकी दिली व विनयभंग केला. या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कान्होपात्रा तेली या करित आहेत.