महाविकास आघाडीचा सलग दुसरा दणदणीत विजय – भाजपला पराभवाचा धक्का
तुळजापूर खरेदी विक्री संघावर महाविकास आघाडी
तुळजापूर – समय सारथी
तुळजापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय झाला आहे. जिल्हा बँक निवडणुकीनंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा हा सलग दुसरा मोठा विजय आहे. 13 जागापैकी महाविकास आघाडीला 10 जागा तर भाजपला केवळ 3 जागावर विजय मिळविता आला. तुळजापूर तालुका खरेदी विक्री संघाची 2021-22 ते 2026-27 या कालावधीची निवडणूक पार पडली.मी म्हजेच पक्ष अर्विभावात राहणारे भावी पालकमंत्र्यांना मतदारांनी पुन्हा एकदा त्यांची जागा दाखवून दिली आहे अशी टिका खासदार ओमराजे यांनी आमदार राणा यांच्यावर प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.
भाजपच्या ताब्यात असलेला खरेदी विक्री संघ महाविकास आघाडीने जिंकला असून ही निवडणूक भाजप व आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती त्यात त्याचा दारुण पराभव झाला. भाजपचे सुहास साळुंके, शिवाजी बोधले व खंडाप्पा पावले हे 3 भाजप उमेदवार निवडणूक आले त्यात साळुंके व बोधले यांना शहरातील मतदारांनी तारले.
महाविकास आघाडीला 10 जागा मिळाल्या त्यात शिवसेना 6 , राष्ट्रवादी व काँग्रेसला प्रत्येकी 2 आशा जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील या ओके जोडीचा पॅटर्नने पुन्हा एकदा धमाल करीत विजय मिळविला त्याला राष्ट्रवादीच्या घड्याळाची व काँग्रेसच्या हाताची योग्य वेळी साथ मिळाली. शिवसेना पुन्हा एकदा किंगमेकर ठरली.
महाविकास आघाडीला एकत्र यश मिळत असल्याने भाजपच्या तंबूत व कार्यकर्त्यात धडधड वाढली आहे, आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यात चुळबुळ व चिंता वाढली आहे. प्रभागात वयक्तिक ताकत व भाजपची ताकत आहे मात्र महाविकास आघाडीच्या समोर आपला निभाव लागेल का ? याची चिंता आतापासून कार्यकर्त्यांना लागली आहे.भाजप एकाकी लढा देत असल्याने आगामी काळात सत्ता संघर्ष हा अधिक तीव्र असणार आहे.सहकार क्षेत्रात झालेल्या 2 निवडणुकीत भाजपला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.
काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेच्या बलाढ्य नेते व कार्यकर्ते यांच्या फौजे विरुद्ध भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांना एकाकी लढत द्यावी लागत आहे त्यांना महाविकास आघाडीच्या अंतर्गत गटाची रसद मिळत आहे मात्र त्याने यश मिळत नाही. आमदार पाटील यांचा सत्ता संघर्ष भाजपात ही कायम आहे.
जिल्हा मध्यवर्ती बॅकेनंतर तुळजापूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघासाठी कपबसीचे चिन्ह महाविकास आघाडीसाठी शुभ ठरले. खरेदी विक्री संघावर 13 पैकी 6 जागांवर शिवसेना, 2 जागांवर राष्ट्रवादी, 2 जागांवर कॉग्रेस चे उमेदवार विजयी झाले असून विरोधी पॅनेलला केवळ 3 जागांवर विजय मिळवता आला आहे. महाविकास आघाडीचे धुरगुडे संजय भानूदास 172 मते, जाधव सुनिल चंद्रहार 169 मते, कदम सुधीर किसनराव-180 मते, श्रीमती सुरेखा सुरेश डोंगरे-208 मते, सौ. वाघे अनिता श्रीकांत 209 मते, चव्हाण अभिजीत अर्जुन 27 मते, चव्हाण राम सौदागर 27 मते, शिंदे अनिल सिद्राम 32 मते हे विजयी झाले आहेत व 10 पैकी 1 जागा बिनविरोध निघाली आहे.