महाराष्ट्राच्या राजकारणात सलीम – जावेद जोडीची जुगलबंदी
मलीक व राऊत यांच्यावर भाजप नेते कंबोज यांची टीका
मुंबई – समय सारथी
महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज सलीम – जावेद जोडीची जुगलबंदी सुरू आहे , ते सलीम म्हणजे नवाब मलीक तर जावेद म्हणजे संजय राऊत आहेत असा आरोप भाजपचे युवा नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.
विषय फक्त कोणाच्या बारचा परवाना रद्द करण्याचा नाहीये तर सत्तेत असताना सत्तेचा आणि अधिकार्यांच्या दुरूपयोग करण्याचा आहे. २४ वर्षानंतर समीर वानखेडेच्या बारचा परवाना रद्द केला गेला, यामध्ये खरच वानखेडेंचा परवाना चुकीचा होता का हे येणारी वेळ ठरवेल पण ज्यांनी हा परवाना रद्द केलाय ते अधिकारी ठाणे कलेक्टर हे संजय राऊत यांचे व्याही ( संजय राऊत यांच्या मुलीचे सासरे ) आहेत. एकीकडे नवाब मलिकांना मुंबई हायकोर्टान कोर्टाचा अवमान करत असल्या प्रकरणात अनेकदा फटकारलं आहे. राज्यात सलीम – जावेदची ही जोडी आपापले पर्सनल स्कोर सेटल करण्यातच लागले आहेत. महाराष्ट्रात आता स्वताची वैयक्तिक दुश्मनीमध्ये बदला घेण्यासाठी आता सत्ता आणि अधिकारांचा वापर केला जातोय का ? अधिकार्यांसोबत असणार्या नात्याचा फायदा स्वताचे वैयक्तीक स्कोर सेटल करण्यासाठी वापरण्यात येतोय का ? हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे
माझा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेलाच आहे की जे सरकार चोरी करून सत्तेत बसलय आणि ज्या पद्धतीनं सरकार चालवत आहे हे योग्य आहे का ? आता जनतेनच याच उत्तर द्याव असे आवाहन करित भाजपचे युवा नेते मोहित कंबोज भारतीय यांनी संजय राऊत आणि नवाब मलिकांवर खोचट टिका केली.