महाआरोग्य शिबीराची जागतिक पातळीवर नोंद – इन्टरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड व एक्सलन्स पुरस्कार प्रदान
आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतुन परंड्यातील शिबिरात ३ लाख रुग्णांची तपासणी व उपचार
धाराशिव – समय सारथी
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ तानाजीराव सावंत व त्यांचे बंधु शिवाजीराव सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदार संघात आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबीराची इन्टरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असुन इन्टरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स पुरस्कार सावंत बंधुना प्रदान करण्यात आला.
महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून ३ लाख ७ हजार रुग्णांची तपासणी व उपचार केल्याबद्दल शिबीराची दखल घेऊन सावंत बंधुचा जगातील सर्वात मोठे महाआरोग्य शिबीर घेेतल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
मुंबईत हिंदी चित्रपट सृष्टीतील काॅमेडी अभिनेते जॉनी लिव्हर आमदार डाॅ भारती लव्हेकर,दिग्दर्शक डाॅ.धर्मेद्र कुमार यांच्या सह विविध बाॅलिवुड क्षेत्रामधील सेलिब्रिटी सह वैद्यकिय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान पत्र,सन्मानचिन्ह देऊन शिवाजीराव सावंत यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.