मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारच्या हालचाली
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी सादर केला 114 पानाचा लेखी अहवाल
मराठा हा कुणबी असल्याच्या कागदपत्रेसह अहवाल सादर
धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी राज्य सरकारकडे 114 पानाचा लेखी अहवाल सादर केला आहे. धारशिव व उमरगा तालुक्यात मराठा हे कुणबी नोंदी असल्याचे पुरावे आढळले असुन धाराशिव तालुक्यात गाव नमुना 14 मध्ये 89 ठिकाणी तर उमरगा तालुक्यात 9 ठिकाणी मराठा हा कुणबी असल्याच्या नोंदी आढळून आले आहेत.
महसूली नोंदीचे पुरावे राज्य सरकारकडे सादर केले असून यात जन्म मृत्यू नोंदी,खासरा पाहणी व इतर महत्त्वाच्या महसुली कागदपत्रावर मराठा समाजाचा कुणबी असा उल्लेख आढळून आला आहे. तो अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे, आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. आज 4 वाजता याबाबत मुंबई येथे राज्य सरकारची महत्वाची बैठक होणार आहे त्यात हा अहवाल महत्वाचा ठरणार आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत पाऊल उचलण्याची शक्यता आहे.