मराठा आरक्षण – वनवास यात्रेतील 2 तरुणाचा पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षणासाठी 2 तरुणांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले त्यामुळे अनर्थ टळला. हैद्राबाद मुक्ती संग्रामचा ध्वजारोहण कार्यक्रम सुरु असताना आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला गेल्याने धावपळ व खळबळ उडाली.
तुळजापूर ते मुंबई या मराठा वनवास यात्रेचे आयोजक सुनील नागणे व प्रताप पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर आंदोलन केले व मराठा आरक्षणाची मागणी केली.मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधुन आरक्षण देण्याची मागणी केली, सर्व सरकारने फसविले असल्याचा आरोप यावेळी केला.
हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे संपन्न झाला. पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजरोहन करण्यात आले, यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यासह उपस्थितीत होते.