मनोमिलन, चर्चा तर होणारच – पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत व माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यात मुबंईत बैठक
उस्मानाबाद – समय सारथी
आरोग्यमंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत व माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यात मुंबई येथे बैठक झाली आहे. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भुम परंडा वाशी या मतदार संघात मनोमिलनाच्या चर्चेला उधाण आले असून या भेटीचा तपशील कळू शकला नाही. यावेळी नुकतेच उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले अनिल खोचरे, तालुका प्रमुख अजित लाकाळ उपस्थित होते.
शिवसेना फुटीनंतर डॉ सावंत हे शिंदे गटात गेले होते तर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे उद्धव ठाकरे गटात राहिले होते. या राजकीय उलथापालथनंतर निष्ठावान ते कारखाना ऊस दाराच्या आरोप प्रत्यारोपनंतर माजी आमदार पाटील व नामदार डॉ सावंत यांचे संबंध ताणले होते मात्र आजच्या भेटीने चर्चा रंगली आहे. मुंबईत बैठक, मतदार संघात खळबळ यासह नेत्यांची भेट, विरोधक कोमात अश्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. ही भेट कुटुंबीक असल्याचे सांगितले जात असले तरी याला राजकीय किनार आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे.