मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती आयोजित शंभुराजे महानाट्य
पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्याकडून 22 लाखांची देणगी
बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांचा पुढाकार
उस्मानाबाद – समय सारथी
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवप्रेमींसाठी यावर्षी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील शंभुराजे हे धगधगते महानाट्य 11, 12 व 13 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. मराठी कन्या प्रशालेच्या भव्य मैदानावर या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत. या महानाट्याकरिता मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीला राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या पुढाकारातून 22 लाखाची देणगी दिली आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गाजलेल्या शंभुराजे या महानाट्याचा प्रयोग सलग तीन दिवस पाहण्याची संधी उस्मानाबादकराना उपलब्ध झाली आहे. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने या महानाट्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. महानाट्यासाठी भव्य मंचाची उभारणी करण्यात येत आहे. या मंच उभारणीचे भूमिपूजन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे मार्गदर्शक विश्वास आप्पा शिंदे, भारत कोकाटे, जयंत पाटील, बाळासाहेब शिंदे, मधुकर तावडे, मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष धनंजय राऊत, माजी अध्यक्ष आशिष मोदाणी तसेच राजाभाऊ शेरखाने, नितीन तावडे, अमरसिंह देशमुख, राजसिंह राजेनिंबाळकर, युवराज राजेनिंबाळकर, उमेश राजेनिंबाळकर, योगेश सोने पाटील, प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे, भीमा जाधव, संजय मुंडे, तुषार निंबाळकर, बलराज रणदिवे, गजानन गवळी, भालचंद्र कोकाटे, ओम नाईकवाडी, अमर माळी, जयंत देशमुख, मिनील काकडे, प्रवीण पवार, राजेंद्र धावारे, डॉ. शिवाजी चव्हाण, दिलीप चौधरी, वैभव मुंडे, संभाजी फरताडे, सतीश कदम, राकेश सूर्यवंशी, सुधाकर पवार, गजानन खर्चे, विलास लोकरे, प्रशांत साळुंके, बिलाल कुरेशी, अभिजित देडे, विकास पवार, रुद्र भुतेकर, विनोद लांडगे, आकाश सर्जे, दाजी आप्पा पवार,शाम निंबाळकर, विक्रम राऊत, शुभम पाडे, कृपालसिंह ठाकूर, प्रवीण कांबळे, संजय गजधने, पंकज चव्हाण, दिग्विजय जावळे, राजकीरण सोनवणे, किशोर साळुंके, सौरभ गायकवाड, राजेश बंडगर, पूजा देडे, देवकन्या गाडे, केंद्रे मॅडम, यांच्यासह मध्यवर्ती सावर्जनिक शिवन्मोत्सव सोहळा समितीचे आजी-माजी पदाधिकारी, शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.