मद्यप्रेमीसाठी धक्कादायक बातमी – कोरोना लसीचे 2 डोस झाले असतील तरच दारू मिळणार , जिल्हाधिकारी यांचे आदेश
लसीकरणसाठी आता लकी ड्रॉ – स्वयंपाकाची भांडी, रोख रक्कम बक्षीस मिळणार
उस्मानाबाद – समय सारथी
औरंगाबाद जिल्ह्यातील मद्यप्रेमींसाठी धक्कादायक बातमी आहे , आता लस घेतली असेल तरच त्या मद्यप्रेमींना दारू मिळणार आहे. लसीचे 2 डोस पूर्ण झाले असतील तरच दारू मिळणार आहे. दुकान विक्रेत्यांना याबाबत खात्री करण्याचे व नियमांचे पालन करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
लसीचा एकही डोस जर झाला नसेल तर त्यांना दारू विक्री करता येणार नाही. लसीचा डोस घेतला नसेल तर दारूचा विषय सोडा असाच काहीसा हा निर्णय आहे.लस घेतली नसेल तर तुम्हाला औरंगाबाद शहर व जिल्ह्यात आता यापुढे दारू मिळणार नाही. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे , यापूर्वी त्यांनी लस घेतली असेल तरच पेट्रोल दिले जाण्याचा निर्णय घेईल होता. विषय निमित्त काहीही असो कोरोना लसीकरण वाढविणे हा या मागचा उद्गात हेतू आहे हे मात्र नक्की.. कोरोना लसीकरण करून स्वतः व कुटुंबाला वाचवा हा संदेश देण्यासाठी विविध क्लुप्त्या वापरल्या जात असून माझे कुटुंब , समाज माझी जबाबदारी याची जाणीव सर्वांना होणे गरजेचे आहे.
लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून आता लवकरच लकी ड्रॉ सुरू केला जाणार आहे. पहिला आणि दुसरा डोस घ्यावा यासाठी स्वयंपाकाची भांडी, रोख रक्कम अशा पद्धतीने बक्षीस ही लकी ड्रॉ मधून देण्याचा विचार केंद्र सरकारकडून केला जातोय. अनेक राज्यांमध्ये लसीकरणचा आकडा वाढलेला नाही त्यासाठी केंद्र सरकारकडून हे प्रयत्न केले जाणार आहेत.अनेक राज्यात , जिल्ह्यात आजही लसीकरण कमी आहे.