मदत नव्हे कर्तव्य – आमदार डॉ तानाजीराव सावंत यांची संकल्पना
500 बेडचे अद्यावत रुग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार
कोरोना संकटात नियोजनबद्ध उपक्रमातून दिलासा देणार
उस्मानाबाद – समय सारथी
शिवजल क्रांतीचे प्रणेते आमदार डॉ तानाजीराव सावंत हे कोरोना संकटात नागरिकांना वैद्यकीय मदत करण्यासाठी सक्रिय झाले असून त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यासह बार्शी येथील रुग्णाच्या सेवेसाठी बार्शी येथे अद्यावत सुविधा असलेले 500 बेडचे रुग्णालय उभारण्याचा संकल्प केला असून ते काम प्रगतीपथावर आहे. या 500 बेडच्या रुग्णालयात 100 बेड हे व्हेंटिलेटरच्या सुविधांचे असून या रुग्णालयात मोफत अद्यावत उपचार दिले जाणार आहेत. आगामी 10 ते 12 दिवसात हे रुग्णालय सुरू होण्याची अपेक्षा आहे यामुळे रुग्णाची सोय होणार आहे. कालच डॉ सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयास भेट देऊन 5 ड्युरा सिलेंडर स्वखर्चातून भेट देत जिल्ह्याचा आढावा घेतला होता.
जिल्ह्यात कोरोनामुळे रुग्णांना इंजेक्शन, औषधी, ऑक्सिजनसह इतर सोयीसुविधेचा व अडचणींचा सामना करावा लागत आहे अपुऱ्या वैद्यकीय सुविधामुळे वेळीच उपचार न झाल्याने काही रुग्ण दगावले देखील आहेत. शिवसेनेचे उस्मानाबाद जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी मंत्री आ. प्रा. डॉ तानाजीराव सावंत यांनी मदत नव्हे कर्तव्य या भूमिकेतून रुग्णालय व मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयास तात्काळ ५ जम्बो ड्युरा ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करून देत लोकसेवकाची जबाबदारी खऱ्या अर्थाने निभावण्याचे काम केले आहे. त्यांच्या ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याच्या योगदानामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला एक प्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे.
सावंत यांनी जिल्ह्याच्या विविध भागात दौरा करून आढावा बैठका घेत शासकीय यंत्रणेला सतर्क करीत अत्यावश्यक लागणाऱ्या सर्व मदतीसाठी मी कुठेही कमी पडणार नाही, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना देखील संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्यासाठी आवश्यक ते बळ देण्याचे आश्वासन दिले आहे. सावंत यांचे काम अतिशय नियोजनबद्ध असून ते आपत्तीच्या काळात जिल्हावासियांच्या मदतीला धावून आले असल्यामुळे त्यांचे काम आगामी काळात फार दिलासादायक ठरणार आहे. यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेना जिल्हा संघटक तथा जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके, नगरसेवक सुरज साळुंके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ डी.के. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
*जलदुत ते प्राणवायू दुत*
उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख दुष्काळी जिल्हा म्हणून सर्वत्र झालेली आहे. जिल्ह्यातील पर्जन्यमान जेमतेम असले तरी पडलेल्या पावसाचे पाणी वाहून जात असल्यामुळे पाण्या अभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कोरडवाहू शेती व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची झालेली घट लक्षात घेऊन आ. सावंत यांनी स्वनिधीतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिव जलक्रांती योजना राबवून परंडा, भूम व वाशी यासह इतर भागात जलसंधारणांची नाला खोलीकरणं, विस्तारीकरण कामे करून या भागात जलक्रांती करून नंदनवन केले आहे.
कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यात नव्हे तर देशात ऑक्सिजनची प्रचंड कमतरता व उणीव भासू लागली आहे व निर्माण झाली आहे. अशा आपत्तीच्या काळात संकट मोचक म्हणून सतत मदतीला धावून येणाऱ्या आ. डॉ तानाजीराव सावंत यांनी ड्युरा सिलेंडर माध्यमातून प्राणवायू उपलब्ध करून त्यांनी जलदुत बरोबरच प्राणवायुदुत म्हणून यशस्वी कामगिरी करून दिलासादायक काम केले आहे.
*संकटात डॉ सावंत खरे कोरोना योद्धा*
डॉ सावंत यांनी यापूर्वी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना मदत, सामूहिक विवाह सोहळे, महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य असे समाज उपयोगी काम केले आहे, या कोरोना संकटात सुद्धा आमदार सावंत यांच्याकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. कोरोना काळात त्यांच्याकडून सातत्याने दौरा , मदत व आढावा घेणे अपेक्षित आहे.