मंदीर प्रवेश बंदी असतानाही प्रवेश करून सुरक्षा रक्षकाला मारहाण
सीसीटीव्हीत कैद – तुळजापुरचे पुजारी संकेत शिंदे यांच्यावर गुन्हा नोंद
उस्मानाबाद – समय सारथी
तुळजापूर येथील पुजारी संकेत अनिल शिंदे यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदीराच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर तैनात असलेले सुरक्षा रक्षक सागर सुरवसे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करुन मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मंदीर संस्थानाचे सहायक व्यवस्थापक नागेश शितोळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कलम 294, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
नियमबाह्य वर्तन केल्याप्रकरणी तुळजापुर येथील पुजारी संकेत शिंदे यांना तीन महिन्याची मंदीर प्रवेश बंदी करण्यात आली असतानाही ते 18 जानेवारीला मंदिरात आले. पहिल्या मजल्यावरील भाविकांची गर्दी कमी झाल्यामुळे इतर भाविकांना तिसऱ्या मजल्यावर न सोडता थेट पाहिल्या मजल्यावर सोडण्यात येत होते त्यावेळी शिंदे यांनी सुरक्षा रक्षक यांच्याशी हुज्जत घातली व शिवीगाळ करून मारहाण केली. सदरील मारहाणीची घटना मंदीर परिसरात बसविलेल्या कॅमेरात कैद झाल्या नंतर त्यानुसार तक्रार देण्यात आली.शिंदे यांना 18 जानेवारी ते 17 एप्रिल अशी 3 महिने मंदीर प्रवेश बंदी असतानाही प्रवेश करून भाविकांना दर्शन रांगेत घुसविणे व सुरक्षा रक्षक यांना मारहाण केली अशी फिर्याद दिली म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद करीत आहेत.