मंत्रीमंडळ निर्णय – ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ मोहिमेसाठी प्रत्येक जिल्ह्याला 2 कोटी, आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत
राज्यात शारदीय नवरात्रोत्सवा पासून सुरू झालेल्या “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या अभियानात दीड कोटीच्या जवळपास माताभगिनींच्या आरोग्याच्या मोफत तपासणी झाली आहे. उर्वरित दोन कोटी माताभगिनींची तपासणी ही देखील अत्यंत नियोजनबद्ध पध्दतीने सुरू असून या तपासणी नंतर काही रोगाचे निदान झाल्यास त्या करिता लागणारे औषधे हे देखील आरोग्य विभागाच्या वतीने मोफत देण्यात येणार असून महिलांना त्यांच्या घरापासून घरापर्यंत सोडण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने मंजूर झाला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्य़ातील जिल्हा नियोजन समितीतून दोन कोटी रूपयाचे अनुदान हे औषधी तसेच वाहतूक व्यवस्थेसाठी मंजूर केले.आरोग्यमंत्री प्रा.डॉ.ताना
जिल्हा नियोजन समितीतून दोन कोटी अनुदान हे प्रत्येक जिल्ह्याने द्यावे असा निर्णय घेतला, त्यानुसार 72 कोटी रूपयांचे अनुदान हे औषधोपचार तसेच वाहतूकी करता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाले.दरम्यान मंत्रिमंडळाने 72 कोटी रूपयांचे अनुदान हे “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानास दिल्याने तपासणी पश्चात ग्रामीण भागातील माताभगिनीना मोफत औषधे मिळतील त्यामुळे अभियानाची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करता येईल असे आरोग्य मंत्री सावंत यांनी सांगितले.वाहतूक व्यवस्था आणी औषधोपचारासाठी मिळणाऱ्या अनुदानामुळे फक्त तपासणी वर न थांबता पुढील उपचारा करिता याचा फायदा होईल अशी भावना महिलांनी व्यक्त केली एवढचे नाहीतर आरोग्य मंत्री सावंत यांचे मनापासून आभार व्यक्त केले.