उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद शहरातील बोंबले हनुमान रोड ( उंबरे कोठा ) या भागातील ८ महिन्याच्या गर्भवती महिलेचा उपचार दरम्यान मृत्यू झाला असून उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनामुळे हा सहावा बळी ठरला आहे. महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्यावर लातूर येथे उपचार सुरु होते मात्र तिचा दुर्दवी मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली तर मंगळवारी जिल्ह्यात ४ कोरोना रुग्णाची भर पडली. उस्मानाबाद तालुक्यातील वाणेवाडी येथील एक , तुळजापूर तालुकयातील सलगरा व मसला असे २ व उमरगा तालुक्यातील बेटजवळगा येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. वाणेवाडीचा रुग्ण हा पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कात होता तर बेटजवळगा येथील रुग्ण मुंबई येथून आला आहे. तुळजापूर तालुक्यातील दोन्ही रुग्ण हे पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या १५३ झाली असून त्यापैकी ११६ जण बरे झाले आहेत तर ३१ जणांवर उपचार सुरू आहेत व ६ जण मयत झाले आहेत.
उस्मानाबाद जिल्हयांत कोरोनाचे १५३ रुग्ण असून त्यात सर्वाधिक रुग्ण उस्मानाबाद तालुका ५७, तुळजापूर १३, उमरगा १७,लोहारा ८, कळंब ३५,वाशी ४, भूम ५ व परंडा तालुक्यात १५ रुग्ण सापडले आहेत तर उस्मानाबाद तालुक्यातील ४२, तुळजापूर ९, उमरगा १५,लोहारा २, कळंब ३४, भूम १ व परंडा तालुक्यातील १३ रुग्ण बरे झाले आहेत. उस्मानाबाद तालुकयातील ५ जण तर उमरगा तालुकयातील १ असे सहा जण कोरोनामुळे मयत झाले आहेत.