उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम शहरात कोरोनाचे ५ रुग्ण सापडले असून हे सर्व रुग्ण लक्ष्मीनगर भागातील आहेत, ते सर्व भूम शहरात पूर्वी सापडलेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात असल्याने शहरात स्थानिक संसर्ग झाला असल्याने धोका वाढला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली. भूम तालुक्यातील रुग्ण संख्या १० झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या १५९ झाली असून त्यापैकी १२५ जण बरे झाले आहेत तर २९ जणांवर उपचार सुरू आहेत व ६ जण मयत झाले आहेत.उस्मानाबाद जिल्हयांत कोरोनाचे १५९ रुग्ण असून त्यात सर्वाधिक रुग्ण उस्मानाबाद तालुका ५७, तुळजापूर १३, उमरगा १७,लोहारा ८, कळंब ३५,वाशी ४, भूम १० व परंडा तालुक्यात १५ रुग्ण सापडले आहेत तर उस्मानाबाद तालुकयातील ५ जण तर उमरगा तालुकयातील १ असे सहा जण कोरोनामुळे मयत झाले आहेत.