विकास @1 > भंगार@16 × भकास@40 राजकीय समीकरण
सोशल मीडियात धुमाकुळ, राजकीय आखाड्यात कार्यकर्त्यांची कुस्ती
भंगार@16 विरोधात भकास@40 वादावर विकास @1 चा पर्याय
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे भाजप,दोन्ही शिवसेना, आप पक्षाचे कार्यकर्ते चार्ज
धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथे भाजपचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोदी @9 या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. सोशल मीडियावर शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर,भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यात जोरदार वाद सुरु असताना त्यात पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या कार्यकर्ते यांनी उडी घेतली आहे.
भंगार व भकास या सर्वश्रुत वादाचा राजकीय इतिहास तसा फार जुना आहे. भंगार@16 विरोधात भकास@40 यावरून वाद विवाद, आरोप प्रत्यारोप होत असतानाच पालकमंत्री डॉ सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी या दोघांच्या वादावर विकास @1 चा तोडगा सुचवला आहे. पाटील-निंबाळकर या परंपरागत वादात विकास होत नसुन डॉ सावंत हे यावर पर्याय आहेत, त्यांचा विकासाचा दृष्टीकोन एक नंबर आहे असा संदेश दिला आहे. भाजप व दोन्ही शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांच्या कुस्तीत अजुन तरी नेत्यांनी थेट उडी घेतली नाही.
डॉ पद्मसिंह पाटील व राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडे सत्ता मंत्रीपद असताना गेल्या 40 वर्षात विकास झाला नसुन जिल्हा भकास झाला असा आरोप करीत शिवसेना ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वी लवकरच भकास@40 अशी बॅनरबाजी केली. राणा पाटील हे विकासासाठी नव्हे तर मंत्रीपद मिळावे यासाठी भाजपात गेले मात्र त्यांनी विकास केला नाही.
खासदार ओमराजे यांनी तेरणा कारखाना ताब्यात दिल्यावर तो चालु कारखाना बंद पाडला व त्या कारखान्यातील भंगार विकले. डॉ पाटील परिवाराने गेली 40 वर्ष काय केले असा प्रश्न विचारणारे ओमराजे हे गेली 15 वर्ष लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी या काळात काय विकास केला हे जनतेला सांगावे असा प्रश्न भाजप व राणा समर्थकांनी भंगार@16 इतिहासातील सर्वात मोठी भंगारचोरी अशी मोहीम राबविली.
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी बंद पडलेला तेरणा साखर कारखाना भाडेतत्वावर घेण्याचे धाडस दाखवून तो सुरु करीत आहेत. जे राणा पाटील व ओमराजे यांना जमले नाही ते सावंत यांनी करुन दाखविले. मंत्री झाल्यावर करोडो रुपयांचा निधी व स्वतःच्या खिशातून कामे, मदत केली. या दोघांच्या वादात विकास झाला नसुन ना भांगर ना भकास आमचा दृष्टीकोन जिल्ह्याचा विकास असे म्हणत एक पर्याय सुचवीला आहे.
आपण दोघे भाऊ सगळे मिळून खाऊ, दोघांकडे बॅनरचा पैसा कुठून आला, उत्तर द्या असे विचारत आम आदमी पार्टीने चिमटा काढला आहे. डॉ पाटील यांना पवनराजे खांद्याला खांदा लावून साथ देत होते.खासदारकी मोदीमुळे मिळाली 15 वर्षात काय दिवे लावले ते सांगा असे आव्हान आपने ओमराजे यांना दिले आहे.
नुसती जळजळ, नुसती मळमळ, गर्दी पाहून शिल्लक शिवसैनिकांना त्रास, बरनॉल,भंगारचोर, सुतमिल, तुळजाई कारखान्याचे शेअर कुठे गेले, पूछता है धाराशिव, गोवर्धनवाडी व तेरच्या वादात माढ्याचा फायदा,@1 हाफकीन,माझा बॅनर कसा गोलगोल 40 वर्ष जनतेसोबत केला झोल झोल ओम कैलास दादा यांनी सगळी देओलची पोलखोल, फक्त नेरुळचा विकास, एका दौऱ्यात फडणवीस यांनी सगळे पक्ष कामाला लावले अश्या अनेक पोस्टने राजकीय आखाडा पेटला