भंगार चोरी प्रकरण आता उच्च न्यायालयात – आम आदमी पार्टीच्या अजित खोत यांची याचिका
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या आवरासह अन्य भागातील भंगार व इतर साहित्य चोरी प्रकरण आताछत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात गेले असुन आम आदमी पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा सरपंच ऍड अजित खोत यांनी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी यासाठी याचिका दाखल केली असुन न्यायालयाने ती स्वीकारली आहे.
भंगार चोरी प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांच्यासह अन्य 4 जणावर गुन्हा नोंद झाला आहे. भंगार चोरी प्रकरणी पहिल्यांदा आपचे ऍड अजित खोत यांनी पोलिसात लेखी तक्रार दिली होती त्यात चोरीचा चौकशी अहवाल व नावे यासह घोटाळ्याची माहिती दिली होती. यलगट्टे आरोपीना वाचवत असल्याचा आरोप केला होता तसेच हे चोरी प्रकरण काही हजाराचे नसून कोट्यावधी रुपयांचे असल्याचे म्हणटले होते. तक्रार देऊनही त्याप्रमाणे कारवाई न झाल्याने खोत यांनी याचिका दाखल केली आहे त्यात महाराष्ट्र शासन, यलगट्टे व आनंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना प्रतिवादी केले आहे.