बाजार समितीसाठी 96.80 टक्के मतदान – उद्या होणार फैसला
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील 8 बाजार समितीसाठी मतदानाची प्रक्रिया आज पार निकाल असुन सरासरी 96.80 टक्के मतदान झाले, उद्या सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. प्रत्येकी 18 संचालक मंडळ अश्या 144 जागा असुन त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. धाराशिव बाजार समितीसाठी 95.48 टक्के, कळंब 95.55, तुळजापूर 98.8, उमरगा 96.80, मुरूम 98.69, भुम 97.81, परंडा 98.71 व वाशी 95.27 टक्के मतदान झाले. 13 हजार 581 पैकी 13 हजार 147 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापुरकर यांनी दिली.
धाराशिव बाजार समितीत 2 हजार 766 पैकी 2 हजार 641 इतके मतदान झाले. तुळजापूर येथे 2 हजार 189 पैकी 2 हजार 147, उमरगा 1 हजार 158 पैकी 1 हजार 121 , मुरूम येथे 993 पैकी 980 , भुम येथे 1 हजार 326 पैकी 1 हजार 297, परंडा येथे 1 हजार 397 पैकी 1 हजार 369 , कळंब 2 हजार 695 पैकी 2 हजार 575 व वाशी येथे 1 हजार 57 पैकी 1 हजार 7 इतके मतदान झाले.
महाविकास आघाडी नेते शिवसेना ठाकरे गट खासदार ओमराजे निंबाळकर , ठाकरे गट आमदार कैलास पाटील , माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील माजी मंत्री काँग्रेस नेते मधुकरराव चव्हाण , माजी मंत्री बसवराज पाटील , माजी आमदार राहुल मोटे व महायुती नेते पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत , शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील , माजी खासदार रवींद्र गायकवाड , माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.