पोलीस कोठडी – तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांना अटक
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, त्यांना पोलिसांनी बांधकाम परवान्याच्या दाखल फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत व एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक जिल्ह्यात जाऊन नाशिक ग्रामीण पोलीसांच्या हद्दीतील लासलगाव येथे तत्कालीन मुख्याधिकारी यलगट्टे यांना अटक केली होती.
यलगट्टे यांच्या शोधासाठी धाराशिव पोलिसांनी पथके तयार करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, आनंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पारेकर, शहर पोलीस ठाण्याचे उस्मान शेख यांच्या पथकांचा यात समावेश होते. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अनेक तांत्रिक मुद्याचं विश्लेषण करीत फरार आरोपीचा ठिकाणा शोधन्यासाठी मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, चव्हाण, तुपे, अशोक ढगारे, बलदेव ठाकूर, रवी अरसेवाड यांनी त्यांनी सापळा रचत ही अटक केली.