पैसा आला कुठून ? मंत्री नवाब मलिक कुटुंबाची उस्मानाबादेत 150 एकर जमीन
मूल्यांकनसह जमीन खरेदी करताना घोटाळा – ईडी चौकशीची भाजपची मागणी
उस्मानाबाद – समय सारथी
ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर जमीन घोटाळ्याचा भाजपने आरोप केला आहे. मलिक यांच्या कुटुंबाच्या नावाने उस्मानाबाद तालुक्यातील जवळा येथे 150 एकर जमीन असून इतकी जमीन खरेदी करण्यासाठी मलिक कुटुंबाकडे पैसा कुठून आला याची चौकशी करावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केली आहे.
उस्मामाबाद सारख्या ग्रामीण भागात तब्बल 150 एकर जमीन घेण्याचे प्रयोजन काय ? यासह जमीन खरेदी करताना मूल्यांकन कमी दाखवून खरेदी खत केले व सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडावीला. शेतकरी नसताना मलिक कुटुंबाने जमीन खरेदी केली असे अनेक बाबी संशयस्पद असून इडीने याची चौकशी करावी अशी मागणी केली. मलिक यांची पत्नी मुलगी व मुलगा यांच्या नावाने ही जमीन असून 8 वर्षांपासून जमीन पडीक आहे.
नवाब यांची पत्नी मेहजबीन नवाब मलिक, सना नवाब मलिक, अमीर नवाब मलिक, निलोफर समीर खान , फराज नवाब मलिक व बुश्रा फराज या नावाने जमीन खरेदी 20 डिसेंबर 2013 रोजी केली आहे. जमीन् बागायती असताना जिरयत जमीन दाखवून मूल्यांकन 1 कोटी 20 लाखाने कमी केले आहे त्यामुळे सरकारचा महसूल बुडाला आहे. कागदोपत्री 2 कोटी 7 लाख ला जमीन खरेदी केल्याचे नमूद केले आहे मात्र प्रत्यक्षात जमीन खरेदी करताना जास्त रक्कम दिली असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या जमिनीवर शेततळे असून बागायत आहे त्यात आलिशान बंगला असताना त्याचे मूल्यांकन खरेदी करताना दाखविले गेले नाही त्यामुळे सरकारचा महसूल बुडाला आहे.
150 एकर जमीन् खरेदी करताना नवाब कुटुंबाकडे इतका पैसा कुठून आला ? हा पैसा बेनामी असल्याचा भाजपचा केला आहे. ईडीने या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशीची मागणी भाजप जिल्हाध्यक्ष नितिन काळे यांनी केली आहे.मलिक कुटुंबाच्या नावाने राज्यात अनेक ठिकाणी असून आहे त्यासाठी पैसा कुठून आला हे चौकशी करावी अशी मागणी भाजपने केली आहे. इडी कार्यालयात जाऊन या बेनामी संपत्ती माध्यमातून आणखी झालेल्या व्यवहारची चौकशी करावी अशी मागणी होत आहे. मलिक कुटुंबाच्या नावावर असलेली जमीन सध्या पडीक असून इथे एक लखनौ येथील वॉचमन देखरेखीसाठी कार्यरत आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सुनील काकडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल काळे, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, राजसिंह राजे निंबाळकर,नितीन भोसले,राहुल काकडे, ओम नाईकवाडी, पांडुरंग लाटे, कुलदीप भोसले यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मलिक यांच्या जागेला भेट देत पाहणी केली.