पलटवार – आरोप करता तसे पुरावे द्या, मी राजकारण सोडतो – रणजित पाटील
केंद्रबिंदू ठेकेदारी – गद्दारांना जनता धडा शिकवेल, मी स्वतः उभा राहणार
शिवसेनेतून हकालपट्टी केल्यावर आधार आम्हीच दिला, कर्तृत्व दाखवा
परंडा – समय सारथी
शिवसेनेच्या शिंदे व ठाकरे गटात पेटलेल्या वादाचा वनवा पेटतच असुन दोन्ही गटांनी पुन्हा एकदा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख दत्तात्रय साळुंके यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत साळुंके यांच्यावर टीकास्त्र डागले. केवळ स्वतःच्या मुलाला व भावाला पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्याकडून महावितरण, बांधकाम विभागातील गुत्तेदारीची कामे मिळवण्यासाठी साळुंके यांनी ही पत्रकार परिषद घेतली असून त्यांनी जनतेची दिशाभूल केली आहे, असा दावा रणजित पाटील यांनी केला.
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना चार अपत्ये असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पद रद्द करावे यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी तक्रारी अर्ज केला होता.त्यावर सुनावणी होऊन विभागीय सहनिबंधक यांनी माजी आ. पाटील यांना संचालक पदावरून अपात्र ठरविले होते. यानंतर आता माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी याला प्रत्युत्तर दिलं त्यावर भूम येथे पत्रकार परिषदे घेऊन पाटील यांचे म्हणणे खोडीत शिंदे गट शिवसेना जिल्हाप्रमुख दत्तात्रय साळुंके यांनी तुम्हीपण दहा वर्षे आमदार होते तुम्ही काय केले, भावनेशिवाय दुसरे काय केले असे म्हटले होते.तेथूनच एकमेंकावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
पुढे बोलताना रणजित पाटील म्हणाले की, साळुंके यांनी शिवसेना सोडून मनसेमध्ये गेले त्यानंतर शिवसेनेत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी त्यांचा प्रवेश घेऊन साळुंके यांना लोणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देऊन निवडून आणल. आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत ज्या ठिकाणी धनंजय सावंत व दत्तात्रय साळुंके उमेदवारी घेऊन उभा राहतील त्याठिकाणी स्वतः उमेदवारी घेऊन आव्हान उभं करणार, या गद्दारांना जनताच धडा शिकवेल, साळुंके यांनी स्वतः च्या मुलाला महावितरण तर भावाला बांधकाम विभागातील गुत्तेदारी मिळवण्यासाठी त्याचबरोबर ऊसबिलप्रश्ना संबंधित आंदोलन केल्याने सावंत परिवार वैफल्यग्रस्त होऊन माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. जे हे आरोप करत आहेत त्यांचे पुरावे द्यावेत, ते आरोप सिद्ध झाल्यावर मी राजकारण सोडेल असा खोचक टोला रणजित पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे. या पत्रकार परिषदेस शहरप्रमुख इरफान शेख, शिराळा गावाचे सरपंच रेवण ढोरे, माजी सरपंच शंकर जाधव, डॉ.अब्बास जाधव, बुध्दिवान लटके, दत्ता मेहेर, राजाभाऊ गायकवाड यांच्या सह आदी उपस्थित होते.
दहा वर्षांत काय केले ? साळुंके यांनी त्यांची उत्तरे द्यावी
दत्तात्रय साळुंके म्हणाले की, तुम्ही दहा वर्षांत काय केलं असा प्रश्न विचारणाऱ्या साळुंके यांना १९९५ साली ज्ञानेश्वर पाटील हे आमदार झाल्यानंतर पंचायत समितीचे सभापती केले, त्यांतर जिल्हा परिषद सदस्य केलं, शिवसेना जिल्हाप्रमुख संधी दिली त्यावेळी दत्ता साळुंके यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतःच्या स्वार्थासाठी उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले होते. त्यामुळे शिवसेना पक्षातून हकालपट्टी केली होती त्यावेळी दरदर भटकत असलेल्या साळुंके यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश दिला. हेच साळुंके विचारतेय आहेत की, तात्यांनी काय केले. त्यावेळीस सावंत राजकारणातही नव्हते. हे संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे, परंतु सावंतांची टिमकी वाजवणाऱ्या साळुंके यांना यांचा विसर पडला अशी टीका केली.