पथनाट्य व फेरीतुन हिंगळजवाडी येथे कायदे विषयक जनजागृती – विधी महाविद्यालयाचा उपक्रम
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित डॉ बापूजी साळुंके विधी महाविद्यालय यांच्या वतीने कायदे विषयक जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी विद्यार्थी यांनी महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक कलह, ग्राहक संरक्षण,शेती व महसूली विषयी कायदे यावर पथनाट्य सादर केले व गावात फेरी काढून जनजागृती केली.
विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही जी शिंदे, प्रा डॉ स्मिता कोल्हे, प्रा नितीन कुंभार, प्रा डॉ संजय आंबेकर, प्रा चांदणी घोगरे, प्रा श्रीयश मैंदरकर, प्रा के पी शिकारे, प्रा अजित शिंदे यांनी पुढाकार घेतला. सरपंच सुरेश पाटील, उपसरपंच अनिल वाकुरे ग्राम पंचायत सदस्य बप्पा गाडेकर, उत्तम गोरे बब्रूवान वाकुरे व ग्रामस्थ उपस्थित होते. या अभियानात विधी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग नोंदविला. यापुढे असे उपक्रम राबविण्याचा मनोदय यावेळी महाविद्यालयाने व्यक्त केला.
गावात फेरी काढून जनजागृती करण्यात आली, महिलांच्या सन्मानार्थ लॉ कॉलेज विद्यार्थी मैदानात, झाडे लावा – झाडे जगवा, मुलगी जगवा – मुलगी शिकवा, शेतकरी अन्नदाता, आत्महत्या रोखा अश्या घोषणा देण्यात आल्या.