धाराशिव – समय सारथी
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व महिला अंमलदार मुक्ता लोखंडे या दोघांना धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्या शेळके यांनी तात्पुरता जामीन मिळावा यासाठी कोर्टात अर्ज केला होता मात्र तो फेटाळला आहे, हा अर्ज फेटाळल्याने शेळके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व महिला अंमलदार मुक्ता लोखंडे यांचा जामीन अर्ज नाकारला असुन त्या दोघांचे पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. वीरेन्द्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र व पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक मारोती निवृत्ती शेळके व महिला पोलीस नाईक मुक्ता प्रकाश लोखंडे यांचेवर आनंदनगर पोलीस ठाणे गुरनं 235/2025 कलम 7, 7 (अ), 12 भ्रष्टाचार अधिनियम सन 1988 अन्वये गुन्हा दाखल असल्याने त्यांना 27 जुन 2025 रोजी निलंबित करण्यात आले आहे. लाच घेतानाची कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश वेळापुरे, निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांनी केली. यासाठी पोलीस अधीक्षक संदीप आटोळे आणि अपर पोलिस अधीक्षक मुकुंद अघाव यांचे मार्गदर्शन लाभले.
आत्महत्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात एका आरोपीवर कारवाई न करण्यासाठी 1 लाख रुपये लाचेची मागणी करुन 95 हजार स्वीकारल्या प्रकरणी धाराशिव लाचलुचपत विभागाने पोलीस निरीक्षक मारुती शेळके व महिला अंमलदार मुक्ता लोखंडे यांना अटक केली आहे, त्या दोघांना धाराशिव येथील कोर्टात हजर केल्यावर त्यांना 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले, त्यावेळी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी बाजु मांडली.