धाराशिव – समय सारथी
राज्यात सर्वत्र सध्या मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळत आहे त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकारणाने घेतला आहे. याबाबत एक परिपत्रकही जारी करण्यात आले आहे, आता या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पावसाची सद्यस्थिती विचारात घेऊन ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेतील चिन्ह वाटपाचा टप्पा पूर्ण झाला आहे अशा संस्था, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिली पदाधिकारी निवडणूक प्रक्रिया प्रलंबित आहे अशा संस्था, तसेच ज्या प्रकरणी संस्थेची निवडणूक घेण्याबाबत मा. उच्च न्यायालय/मा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत अशा संस्था वगळून महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम 2014 मधील नियम 4 मध्ये नमुद केलेल्या ‘अ’ व ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.