नाईट कर्फ्यु लागु – मध्यप्रदेश सरकारचा मोठा निर्णय तर महाराष्ट्रात सर्वाधीक ओमीक्रॉन रुग्ण
उस्मानाबाद – समय सारथी
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्या व संभाव्य धोके पाहता मध्यप्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रात्री अकरा ते सकाळी पाच वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यु लागु करण्यात आला आहे. ओमीक्रॉंनमुळे मध्यप्रदेश सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेश सरकारने हा निर्णय घेतल्याने देशात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र राज्यात आज ओमिक्रॉन रुग्णांची उच्चांकी नोंद झाली असून राज्यात 23 रुग्णांची नोंद झाली त्यापैकी 13 रुग्ण एकट्या पुण्यात सापडले आहेत तर मुंबई 5 उस्मानाबाद जिल्ह्यात 2 रुग्ण सापडले आहेत. ठाणे ,मीरा भाईंदर आणि नागपूर प्रत्येकी 1 रुग्ण सापडला.