उस्मानाबाद – समय सारथी
धोक्याची घंटा – उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे ३ नवे रुग्ण
सावधान , संसर्ग सुरु झाला – कळंब तालुक्यात २ तर भूम येथे १ रुग्ण
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आजचा रविवार हा धक्कादायक ठरला असून जिल्ह्यात ३ नव्या रुग्णाची वाढ झाली असून यात कळंब तालुक्यातील २ तर भूम तालुक्यातील १ जणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे. आज २८ पैकी २५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ३ रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात पूर्वी उपचार घेत असलेले ४ व आज नवीन ३ रुग्ण अशी उपचार घेत असलेल्या रुग्ण संख्या ७ झाली आहे तर एकूण रुग्णाचा आकडा १० वर गेल्याने एकेकाळी ग्रीनझोन मध्ये असलेल्या उस्मानाबादची वाटचाल रेडझोनच्या दिशेने सुरु आहे असेच दिसते. आज रविवारी सापडलेले ३ रुग्ण हे कोरोनाबाधित रुग्णाच्या हायरिस्क संपर्कातील असल्याने कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ही बाब धोक्याची घंटा असून संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी काळजी घेत कोरोना लॉकडाउन नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून आजतागायत एकुण 799 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात उस्मानाबाद तालुक्यातील 168, तुळजापूर 145, उमरगा 206, लोहारा 52, कळंब 145, वाशी 11, भूम 19, परंडा 53 अशा व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 748 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 28 व्यक्तीचा अहवाल (Rejected) आला आहे तसेच 17 व्यक्तींचे अहवाल हे अप्राप्त आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर १० कोरोनाचे रुग्ण सापडले असून त्यापैकी ३ रुग्ण हे बरे झाले असून हे रुग्ण उमरगा तालुक्यातील होते. तर इतर ७ पैकी कळंब तालुक्यात ५ व भूम आणि परंडा तालुक्यात प्रत्येकी १ असे २ कोरोनाचे रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कळंब येथील 1 रुग्णांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून दि 15 मे रोजी शासकीय वैदयकीय महाविदयालय सोलापूर येथे पुढील उपचारसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.