धोकादायक – आरटीपीसीआर निगेटिव्ह मात्र ओमीक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह , काळजी घ्या
ओमीक्रॉनचे बदलते स्वरूप, रुग्णासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन – डॉ मुल्ला
उस्मानाबाद – समय सारथी
कोरोनाचे बदलते ओमीक्रॉन स्वरूप हे धोकादायक ठरताना दिसत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर 2 रुग्ण हे पॉझिटिव्ह सापडले आहेत. हे दोन्ही रुग्ण नात्याने पिता पुत्र असून उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील आहेत. 43 वर्षीय व्यक्ती परदेश दुसऱ्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आली होती मात्र त्यांचा 16 वर्षीय मुलाचा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह आला होता मात्र त्या मुलाचा ओमीक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह मात्र ओमीक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह असल्याने विशेष काळजी घ्यावी असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मुल्ला यांनी केले आहे.
ओमीक्रॉन सापडलेल्या या दोन्ही रूग्णांची प्रकृती स्थीर असुन 43 वर्षीय व्यक्तीला माईल्ड म्हणजे कमी लक्षणे आहेत तर 16 वर्षीय मुलाला कोणतीही लक्षणे नाहीत. कोरोनाचे हे बदलते स्वरूप आगामी काळात डोकेदुखी ठरणार असुन विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना रुग्णाबरोबरच ओमीक्रॉन रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीसाठी रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याचे डॉ मुल्ला म्हणाले.