धाराशिव नाव वापरण्याबाबत उच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश
मुंबई – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामकरण बाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचे आदेश दिले असुन पुढील सुनावणी 6 जून रोजी होणार आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली यावेळी 10 जून पर्यंत धाराशिव हे जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव शासकीय व इतर कामकाजासाठी वापरू नये असे आदेश दिले आहेत.
महसूल व जिल्हा परिषद विभागाकडून उस्मानाबाद जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव धाराशिव असे वापरले जात होते त्याबाबत आजच्या सुनावणीत पुरावे व प्रशासकीय पत्रव्यवहार कोर्टात सादर करण्यात आला त्यानंतर कोर्टाने सूचना केल्या त्यामुळे आता ते वापरू नये असे कोर्टाने सांगितले आहे.
संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्याचे व उस्मानाबाद तालुका नाव बदलन्याची प्रक्रिया सध्या सुरु असुन आक्षेपावर सुनावणी सुरु आहे. केवळ उस्मानाबाद शहराचे नाव हे धाराशिव केले असुन त्याबाबत सरकारने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे त्यामुळे शहरासाठी धाराशिव हे नाव वापरता येणार आहे मात्र जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे धाराशिव वापरू नये, ते उस्मानाबाद असे वापरावे असे नमूद केले आहे.
जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे पुढील सुनावणी पर्यंत उस्मानाबाद हेच वापरावे असे कोर्टाने सूचित केल्याची माहिती याचिकाकर्ते याचे वकील ऍड प्रज्ञा सतीश तळेकर यांनी दिली.
महाविकास आघाडी व शिंदे फडणवीस या दोन्ही सरकारने औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मसुद शेख, खलील सय्यद, मोहम्मद मुस्ताक अहमद चाऊस यांच्यासह इतर 19 जणांनी नामकरण विरोधात याचिका सादर केली आहे.