दौरा बदल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता 16 जुनला धाराशिव जिल्ह्यात
धाराशिव – समय सारथी
भाजपचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 15 जुन ऐवजी आता 16 जुन रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार असुन मोदी @9 साठी येणार आहे. भाजपने या दौऱ्याच्या निमित्ताने लोकसभेची तयारी सुरु केली आहे.
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 9 वर्षात मोदी सरकारने देशात व राज्यात शिंदे फडणवीस यांनी जे काम केले आहे ते लोकांना सांगणार आहेत.महाजनसंपर्क अभियान सुरु केले असुन त्यात मोदी @9 या उपक्रमनुसार प्रत्येक लोकांपर्यंत पोहचणार आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राजसिंह राजे निंबाळकर, ऍड मिलिंद पाटील, नितीन काळे, खंडेराव चौरे, सुधीर पाटील,ऍड व्यंकट गुंड, सतीश दंडनाईक, नेताजी पाटील, रामदास कोळगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.
मुंबई सोलापूर येथून निघतील 12 वाजता तामलवाडी येथे येथील त्यानंतर पांगरधरवाडी येथे नागरिक संवाद साधतील. तुळजापूर येथे तुळजाभवानी दर्शन घेऊन संस्थान कार्यालयात तुळजाभवानी विकास आराखडा येथे माहिती घेऊन पाहणी करतील.
धाराशिव येथे शासकीय महाविद्यालय जागा पाहणी करतील व नंतर संपर्क से समर्थन अंतर्गत मराठवाडाचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भास्कर नायगावकर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन संवाद साधतील. या दौऱ्यात ते धाराशिव जिल्हा विकासाबाबत अनेक ठोस निर्णय घेतील असे आमदार पाटील म्हणाले.
उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 3 मंत्री यांची बैठक होईल, यात कौशल्य विकास, तंत्र शिक्षण व वैद्यकीय शिक्षण यांची बैठक होऊन नंतर शासकीय मेडिकल कॉलेज जागेबाबत निर्णय होईल. एमआयडीसी विकास, टेक्निकल टेक्सटाईल पार्क असे विषयावर आढावा बैठक होईल.