दिलासादायक – स्टोन क्रशर सुरु करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश, दंडात्मक कारवाईला तात्पुरती स्थगिती
उस्मानाबाद जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांची माहिती
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील स्टोन क्रशर चालकांना दिलासा मिळाला आहे. गेली वर्षभरापासून कुलूपबंद असलेले 36 स्टोन क्रशर सुरु करण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली. आकारण्यात आलेली दंडात्मक कार्यवाही निकाल लागेपर्यंत तात्पुरती स्थगित करण्यात आली असून बंद स्टोन क्रशर चालू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांनी द्यावी असे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी स्टोन क्रशर संघटनेच्या पदाधिकारी सोबत बैठक घेतली होती.
उस्मानाबाद तालुक्यातील प्रेमलता संजय लोखंडे, श्रीराम देशमुख, जाफर शेख, अशोक कुऱ्हाडे, रविराज पिराजी मंजुळे, पंडीत मंजुळे, प्रदिप वीर, रामलिंग तौर, सुषमा सतीश पडवळ, परंडा तालुक्यातील अमोल पाटील, लक्ष्मण जेकटे, धनाजी खडके, रोहिदास उबाळे, अमोल नलवडे, वाशी तालुक्यातील गोरख शिंदे व दादाराव शिंदे, तुळजापूर तालुक्यातील भाऊसाहेब मलबा, अविनाश शिंदे व धनराज टिकांबरे, लोहारा तालुक्यातील बाळू जाधव, कळंब तालुक्यातील रामराजे पाटील, लक्ष्मण लष्करे व शंकर ईटकर, भुम तालुक्यातील कैलास जाधव, रेवण ठोंबरे, अशोक माने, अमरजीत स्टोन क्रशर, शिवशंकर पौळ व अशोक नरके, उमरगा तालुक्यातील संजय जेवळीकर व सुमन गोपाळराव तावशीकर यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अपील दाखल केले होते त्यावर हे आदेश दिले आहेत.
नियमांचे पालन न केल्याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यातील स्टोन क्रशर यांना दंड आकारण्यासह सील करण्याची कारवाई तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी केली होती त्यानंतर हे क्रशर बंद होते.