दिलासादायक – उस्मानाबाद जिल्ह्यात तूर्तास लॉकडाउन नाही , जिल्हाधिकारी दिवेगावकर यांची माहिती
नागरिकांच्या जबाबदारीत वाढ, मंदिरे सुरू राहणार तर नियमांची कठोर अंमलबजावणी
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद शेजारील बीडसह मराठवाड्यातील नांदेड व परभणी या 3 जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाउन लागतोय की काय याची चर्चा व धाकधूक सर्वांना लागलेली असतानाच जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाउन बाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली त्यामुळे काही प्रमाणात तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे
जिल्ह्यात तूर्तास तरी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात येणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली .उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असली तरी चाचणीच्या तुलनेत रुग्ण सापडण्याचे प्रमाण, मृत्यूदर हा इतर जिल्ह्याच्या व राज्याच्या तुलनेत कमी व नियंत्रणात आहे त्यामुळे लॉकडाउन होणार नाही मात्र कोरोना रोखण्यासाठी नागरिकांची जबाबदारी वाढणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे ज्या ठिकाणी लॉकडाउन करण्यात आला आहे त्या जिल्ह्याच्या तुलनेत कमी असल्याने लॉकडाउनचा कठोर निर्णय तूर्तास घेण्यात येणार नाही मात्र नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे
.लॉकडाउन नाही याचा अर्थ सगळं काही नियंत्रणात व खुलेआम असे नाही, जर लॉकडाउन टाळायचा असेल तर नागरिकांनी मास्कचा वापर , सुरक्षित अंतर व गरज असेल तरच घराबाहेर पडणे यासह अन्य नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तुळजापूरसह अन्य मंदिरे व प्रार्थना स्थळे बंद करण्यात येणार नसून त्या ठिकाणी नो मास्क नो एंट्री हा नियम कायम असणार आहे. जिल्हाधिकारी यांनी लॉकडाउन न करण्याचा घेतलेला निर्णय दिलासादायक असला तरी आगामी काळात नागरिकांची जबाबदारी यामुळे वाढणार आहे.
आता राज्यात सध्या तरी सरसकट लॉकडाउन करण्यात येणार नसून कोरोना रुग्णाची आकडेवारी व स्थानिक स्तिथी पाहून टप्याटप्याने लॉकडाउन बाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व प्रमुख अधिकारी यांच्याशी संवाद साधला त्या बैठकीत कोरोनाशी लढा देण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्यानुसार उस्मानाबाद जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी महत्वपूर्ण माहिती दिली.
जिल्हा लॉक डाउन करण्यापूर्वी ज्या भागात जास्त रुग्ण आहेत तो भाग बंद केला जाईल त्यांनतर तालुका बंद व तरीही स्तिथी कंट्रोलमध्ये आलीच नाही तर संपूर्ण जिल्हा बंद होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. प्रत्येक आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह रेट तपासला जाणार असून त्यानुसार कडक निर्बंध व उपाययोजना याबाबत निर्णय घेतले जाणार आहेत तसेच दैनंदिन स्तिथी पाहून निर्णय घेतला जाणार आहे. हॉटेल रेस्टॉरंट कोणत्याही स्तिथीत सुरू करायचे नाही असे मुख्यमंत्री यांचे आदेश असून ते सुरू करावे कितीही दबाव आला तरी गर्दी करणारे ठिकाणे सुरू करायची नाहीत असे बैठकीत ठरले आहे.
राज्यात 2 नवीन स्टेन असून त्या नुसार काळजी घ्याचे आदेश देण्यात आले आहेत. लक्षणे नसणाऱ्या रुग्णाची संख्या वाढत आहे. लक्षणे असणाऱ्या रुग्णाबाबत आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्याचे जिल्हाधिकारी दिवेगावकर म्हणाले.मृत्यू दर कमी करण्यासाठी कोमॉरबिड लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करून घेणार असून 1 एप्रिल पासून 45 वर्ष वरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज असून एक आठवडा पुरेल इतका लसीचा साठा असल्याचे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी सांगितले. 45 वर्ष पेक्षा जास्त वयोगटातील पत्रकार व प्रसार माध्यमात काम करणारे कर्मचारी तसेच वृत्तपत्र विक्रेते याचे 1 एप्रिल च्या पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यावर भर असणार आहे असेही ते म्हणाले तसेच 45 वर्ष खालील पत्रकार यांच्या लसीकरण बाबत यादी मान्यतेसाठी सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी चाचणी संख्या वाढविण्यात येणार आहे, उस्मानाबाद येथे दुसऱ्या कोरोना आरटीपीसीआर लॅबला मंजुरी देऊन ती कार्यान्वित झाल्याने जास्तीत जास्त तपासणी करण्यात येणार आहे.आगामी 7 दिवस पुरेल इतका वाक्सिन साठा उपलब्ध आहे .
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरांसह इतर मंदिरे व पार्थना स्थळे बंद करण्याचा सध्या कोणताही विचार किंवा सूचना नाहीत मात्र या ठिकाणी नो मास्क नो एन्ट्री कायम असणार आहे तसेच गर्दी होणार नाही यासाठी कडक नियम व त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे तसेच पुजारी व व्यापारी यांची चाचणी बंधनकारक करण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील स्तिथी सध्या तरी नियंत्रणात असली तरी लोकांनी गाफील न राहता , प्रशासनाने दिलेल्या सूचना व आदेशाचे पालन काटेकोरपणे केले तरच आगामी काळात लॉकडाउन सारखा कठोर निर्णय टाळता येणे शक्य आहे. लॉक डाउन करायचा का नाही हे संपूर्णपणे आता नागरिकांच्या हातात आहे असे जिल्हाधिकारी दिवेगावकर म्हणाले.