उस्मानाबाद – समय सारथी
मंकावती तिर्थकुंड प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर अटक केलेले देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी हे सध्या सोमवार पर्यंत तुळजापूर पोलिसांच्या पोलीस कोठडीत असून त्यांचे फोटो असलेले काही विडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत मात्र त्या विडिओचा रोचकरी यांचा व त्यांच्या कार्यकर्ते यांचा संबंध नसल्याचा खुलासा करीत हे विरोधकांचे षडयंत्र असल्याचा आरोप गणेश रोचकरी यांनी केला आहे , याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केलीय.
काय होते व्हारल व्हिडिओ …
हिशोब सगळ्यांचा होणार , असं कसं सोडणार शेठ यासह कुछ लोग हमारा नाम मिटाना चाहते है, अरे नादान है वो लोग,जो समंदर को सुखाना चाहते है … असे काही विडिओ आज सोशल मीडियावर आमचं सरकार, देवराज सरकार या नावाखाली काही जणांनी पोस्ट केले होते त्यांनंतर रोचकरी व त्यांचे विडिओ पुन्हा चर्चेत आले होते मात्र रोचकरी यांच्या कडून खुलासा करण्यात आला आहे.
काय आहे खुलासा पोस्ट –
लोकनेते देवानंद भाऊ रोचकरी यांच्या फोटो व्हिडिओ बनवून पिक्चरचे डायलॉग, गाणे बनवून विडिओ शोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, हे एक विरोधकांचे षडयंत्र असून त्या विडिओचा आमचा व आमच्या कार्यकर्त्यांचा यात काडीचाही संबध नाही याची नोंद घ्यावी. तुळजापूर तालुक्यातील देवराज मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी अशा पोस्ट सोशल मीडियावर पडलेली दिसल्यास तात्काळ त्या व्यक्तीस ती पोस्ट डिलिट करण्यास सांगावी. -गणेश रोचकरी-
यापूर्वीचे चर्चेतील विडिओ –
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिलेल्या आदेशाला नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिल्यावर आनंदोत्सव व्यक्त करणारे काही विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
देवराज सरकार’ सह ‘हिंसा परमोधर्म’,’बाप म्हणतात तुळजापूरचा’ व तालुक्याचा 7/12 तुमच्या आईबापाच्या नावावर आहे का? मग कोणाच्या आईबापाच्या नावावर आहे, ते सांगा. मग 7/12 रिकामा करुन घेतो आम्ही, अशा आशयाचे मुळशी पॅटर्नचे फिल्मी डायलॉग असलेले विडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल केले होते त्यामुळे या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली होती.