*शेतकऱ्यांना दिलासा – राजकीय व आर्थिक समीकरण बदलणार, तेरणा व सावंत ठरविणार आगामी दिशा*
*राजकीय विश्लेषण*
https://www.samaysarathi.com/2021/11/Terna-sawant-political-analysis.html
तेरणेचा प्रश्न मिटला – आमदार डॉ सावंत यांच्या भैरवनाथकडे तेरणा आगामी 25 वर्षासाठी भाडेतत्त्वावर
उस्मानाबाद – समय सारथी
जिल्ह्यातील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना आगामी 25 वर्षासाठी सहकारी भाडेतत्वावर शिवसेना नेते आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ शुगरला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर घेण्यात आला. मार्च 2022 पर्यंत कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे मात्र आगामी गळीत हंगामपासुन तेरणेचा गाळप पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार,उपाध्यक्ष कैलास शिंदे, संचालक सुनील मालक चव्हाण,संजय देशमुख-देसाई,विकास बारकुल, सतीश दंडनाईक, विजय घोणसे-पाटील यांच्यासह संचालक उपस्तिथ होते त्यांचे सत्कार तेरणा संघर्ष समितीने केला.
भैरवनाथ शुगर वर्क्स यांनी वेळेत निविदा सादर केल्याने ती ग्राहय धरली गेली तर लातूर येथील 21 शुगर्सने वेळेत निविदा सादर न केल्याने ती ग्राहय धरली गेली नाही. निविदा सादर करतेवेळी समूह कार्यकारी संचालक रवींद्र शेलार, संचालक विक्रम उर्फ केशव सावंत यांनी बाजू मांडली.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कार्यकारी संचालक धनंजय सावंत, युवा सेनेचे राज्य विस्तारक सुरज साळुंके, यांच्यासह तेरणा साखर कारखाना बचाव संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.