तुळजाभवानी मंदिरातील 3 पूजाऱ्यांवर मंदिर प्रवेश बंदीची कारवाई
उस्मानाबाद – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील 3 पूजाऱ्यांवर मंदिर संस्थानने मंदिर प्रवेश बंदीची कारवाई केली आहे यातील 2 पूजाऱ्यांना प्रत्येकी एक वर्ष तर एका पूजाऱ्याला 3 महिने प्रवेश बंदी केली आहे. सुरक्षा रक्षक यांच्यावर प्राणघातक हल्ला करणे व भाविकांना अनधिकृतपणे दर्शनासाठी आत सोडणे या कारणामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पुजारी संदीप टोले व कृष्णा जितकर यांना प्रत्येकी 1 वर्ष मंदिर प्रवेश बंदी केली आहे तर ओमकार भिसे यांना 3 महिने प्रवेश बंदी केली आहे. टोले व जितकर यांनी सुरक्षा रक्षकला मारहाण केली होती त्यामुळे त्यांच्यावर कलम 307 नुसार जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला होता.
तुळजाभवानी मंदिरातील 2 पूजाऱ्यावर 307 कलम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यानंतर आता त्यांच्यावर मंदिर प्रवेश बंदीची कारवाई केली आहे. या पूजाऱ्यांनी मंदिरातील सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करीत गंभीर झाले केले होते. पुजारी कृष्णा जितकर व संदीप टोले यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा तुळजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता.
मंदिरात भाविकांना दर्शन रांगेत सोडण्याच्या कारणावरून 2 पूजाऱ्यांनी एकत्र येत सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 2 पूजाऱ्यांनी सुरक्षा रक्षक दीपक चौघुले यांना दगड, नारळ व विटांनी गंभीर मारहाण करीत फरफटत बाहेर आणले. सुरक्षा रक्षक चौघुले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी सोलापूरला दाखल झाल्यानंतर त्यांच्या जबाबावरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा नोंद झाल्यावर मंदिर प्रशासनाने प्रवेश बंदीची कारवाई केली आहे.